शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड-चिपळूण महामार्ग: अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करणार, मनसे तालुकाध्यक्षांचा इशारा; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:55 IST

कोयनानगर : कऱ्हाड-चिपळूण महामार्गाविरोधातील उपोषणादरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न करता संबंधित कंपनी व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते व ...

कोयनानगर : कऱ्हाड-चिपळूण महामार्गाविरोधातील उपोषणादरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न करता संबंधित कंपनी व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते व जनतेची फसवणूक केली आहे. येत्या पंधरा दिवसांत आश्वासनांची पूर्तता न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी दिला. पाटण येथे मनसे कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पाटण शहरप्रमुख चंद्रकांत बामणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.गोरख नारकर म्हणाले, २३ सप्टेंबर २०२४ रोजी कऱ्हाड-चिपळूण रस्त्याच्या निकृष्ट व दिरंगाई कामाविरोधात आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, उपोषण स्थगितीनंतर सुमारे साडेतीन महिन्यांमध्ये दिलेल्या आश्वासनामधील कोणतेही काम पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आले असून, संबंधित अधिकारी कामात कसूर करत ठेकेदार कंपनीला पाठीशी घालत आहेत. महामार्गाच्या कामाबाबत पाटणचे महसूल, पोलिस, वनविभागाचे अधिकारी व महामार्ग अधिकाऱ्यांना अनेकदा पत्रव्यवहार करुन पुराव्यानिशी माहिती दिली असतानाही संबंधितावर कारवाई होताना दिसत नाही.महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता येत्या १५ दिवसांत करावी. अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा गोरख नारकर यांनी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडChiplunचिपळुणhighwayमहामार्गMNSमनसेagitationआंदोलन