शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जीवा-शिवाची बैलजोडं.. आता झुरत्यात दावणीपुढं!

By admin | Updated: April 22, 2015 00:29 IST

शर्यत बंदीचा परिणाम : पशुधन पोसताना बैल मालकांच्या तोंडचं पाणी पळालं

नीलेश भोसले - सायगाव  : काळा कुळकुळीत रंग, दगडी मस्तक, घागरीएवढं वशींड, नुसता फुरफुरला तरी रस्त्यावरचा धुरया उडवणारा ‘खिलार’ जातीचा ‘शिवराज.’ तीन जिल्हे आणि तेरा तालुक्यांमधून तब्बल दिडशेपेक्षा जास्त मैदानं मारलेला ‘शिवराज’ बैल आज दावणीवर टाचा घासत उभा आहे. बैलगाड्या शर्यतीवर बंदी घातलेल्याला जवळपास एक वर्ष उलटत आलं तरी बंदी उठवण्याची काहीही चिन्हं दिसत नसल्यामुळं लाखमोलाचं पशुधन पोसता पोसता बैल मालकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महामुलकरवाडी, ता. जावली येथील शेतकरी शरद राजाराम महामुलकर यांनी दीड ते दोन वर्षांपूर्वी उंब्रज येथून तीन लाख रुपये किमतीचा खिलार जातीचा बैल घेतला होता. केवळ छंदापोटी घेतलेला हा बैल विविध स्पर्धांमधून बक्षिसे मिळवत होता; परंतु वर्षभरातच बैलगाड्या शर्यतीवर बंदी आल्याने हे लाखमोलाचं पशुधन फक्त पोसण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नाही. महिन्याकाठी एका बैलाचा दहा ते बारा हजार रुपये खर्च होत असल्याने आणि आज ना उद्या शर्यतीवरील बंदी उठेल, या आशेपोटी ही जीवापाड जपलेली जनावरे कर्ज काढून जगवण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ही व्यथा कुणा एका ‘शिवराज’ बैलाची किंवा शरद महामुलकरांची नाही. ही व्यथा शर्यतबंदीचा फटका बसलेल्या हजारो बैलमालकांची आहे. जे सरकारने घातलेली बंदी उठण्याकडे डोळे लावून बसले आहेत. वास्तविक पाहता शर्यतीतून फारशी आर्थिक मियकत होत नाही. वाहतूक खर्च, जॅकीचे मानधन जाता फार कमी रक्कम हातात मिळते. हा धोका पत्करून केवळ छंदापोटी आणि शर्यतीची परंपरा टिकवण्यासाठी बैल पाळले जातात.शर्यत बंदीमुळे खेडोपाड्यातील जत्रा आणि त्यावर बेतलेली आर्थिक गणितं कोलमडून पडली. यांत्रिकीकरणामुळं कमी होणारं पशुधन भविष्यात खिलार गायी नामशेष करेल. हे पशुधन वाचायचं असेल तर शर्यतीवरील बंदी उठवणं अगत्याचं आहे, असं जाणकार सांगत आहेत. एका बैलापाठीमागं महिन्याकाठी होणारा खुराकाचा खर्चखपरी पेंड १ पोतं, गहू भुस्सा १ पोतं, मका चुणी १ पोतं, ओला आणि सुका चारा अंदाजे १०० पेंडी, सर्व मिळून सरासरी १० ते १२ हजार खर्च, याव्यतिरिक्त औषधपाणी, वाहतूक खर्च.अश्ी राखली जाते बैलांची निगा दररोज नित्यनियमाने मालीश, दोन दिवसातून एकदा अंघोळ, शिंग, खूर, डोळ्यांची विशेष निगा, पंधरा दिवसांतून एकदा पाय मोकळ करण्यासाठी फेरफटका. हा छंद जीवाला लावी पिसे..!शर्यतीवरच्या प्रेमापोटी घेतलेला ‘शिवराज’ आज आमच्या कुटुंबाचा सदस्य झाला आहे. नुकताच त्याचा आम्ही धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. त्यासाठी केकही आणला होता. आज सरकार जनावरांचे हाल होवू नये म्हणून शर्यतीवर बंदी आणत आहे. स्वत:च्या मुलासारखा ज्या जनावरांचा सांभाळ केला, त्याला कुठलाही जातीवंत मालक स्वप्नातसुध्दा त्रास देणार नाही. आज चौखुर उधाळणारं जनावर असं दावणीला उभं बघून काळीज तीळ तीळ तुटतंय..! - शरद महामुलकर (बैलमालक)