Satara: डोळ्यात भंडारा टाकून चार भाविकांचे दागिने हिसकावले, पाल यात्रेतील घटना

By दत्ता यादव | Updated: January 23, 2024 14:27 IST2024-01-23T14:27:19+5:302024-01-23T14:27:56+5:30

सातारा : पाल, ता. कऱ्हाड येथील यात्रेत 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष अन् भंडाऱ्याची उधळण होत असतानाच दुसरीकडे मात्र, चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून ...

Jewels snatched from four devotees by putting blindfolds in their eyes, incident in Pal Yatra satara | Satara: डोळ्यात भंडारा टाकून चार भाविकांचे दागिने हिसकावले, पाल यात्रेतील घटना

Satara: डोळ्यात भंडारा टाकून चार भाविकांचे दागिने हिसकावले, पाल यात्रेतील घटना

सातारा : पाल, ता. कऱ्हाड येथील यात्रेत 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष अन् भंडाऱ्याची उधळण होत असतानाच दुसरीकडे मात्र, चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून हातोहात तब्बल तीन लाखांचे दागिने गायब करण्यात आले. ही घटना दि. २२ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

उंब्रज पोलिस ठाण्यात अनोळखी पाच जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाल यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता. या यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास खंडोबा -म्हाळसा विवाह सोहळा पार पडत असतानाच भंडारा व खोबऱ्यांच्या तुकड्यांची उधळण केली जात होती. त्याचवेळी भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून त्यांचे दागिने लुटले जात होते. 

खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा झाल्यानंतर चार भाविकांचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. संगीता राजन कांबळे (वय ५०, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र हिसकावून नेले. अमर रंगराव पाटील (वय ३५, रा. आसगाव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावली. त्याचबरोबर आक्काताई शिवाजी भवर (रा. वेजेगाव, ता. खानापूर, जि. सांगली) यांच्याही गळ्यातील ६८ हजार रुपये किमतीची साेन्याची मण्याची माळ तर सतीश आनंदराव माेरे (रा. किणी, ता. हातकणंगल, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील २१ ग्रॅम ५०० मिली वजनाची सुमारे १ लाख १४ हजार ४८७ रुपयांची साेन्याची चेन हिसकावून नेली. अशा प्रकारे एकूण ६ तोळ्यांचे सुमारे ३ लाख २ हजार ४८७ रुपयांचे दागिने हिसकावून नेण्यात आले. 

या प्रकारामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. ज्यांना तक्रार देणे शक्य होते. अशा भाविकांनी उंब्रज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आणखी बऱ्याच लोकांचे दागिने चोरीस गेल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे हे अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

पाल यात्रेत लाखो भाविकांची गर्दी लोटली होती. त्यातच भाविकांच्या अंगावर भंडारा असल्यामुळे चेहरे ओळखून येत नव्हते. त्यामुळे या यात्रेत दागिने चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर माेठे आव्हान असणार आहे.

Web Title: Jewels snatched from four devotees by putting blindfolds in their eyes, incident in Pal Yatra satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.