दाम्पत्याच्या बॅगमधून रोकडसह, दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:46 IST2019-10-05T13:45:33+5:302019-10-05T13:46:52+5:30

साताऱ्याहून पुसेगावला जात असताना सफारी गाडीमधून दाम्पत्याचे साडेचार तोळ्यांचे दागिने आणि ५० हजारांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात घडली.

Jewelry lengthened, with cash from the couple's bag | दाम्पत्याच्या बॅगमधून रोकडसह, दागिने लांबविले

दाम्पत्याच्या बॅगमधून रोकडसह, दागिने लांबविले

ठळक मुद्देदाम्पत्याच्या बॅगमधून रोकडसह, दागिने लांबविलेशहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सातारा : साताऱ्याहून पुसेगावला जात असताना सफारी गाडीमधून दाम्पत्याचे साडेचार तोळ्यांचे दागिने आणि ५० हजारांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, एक दाम्पत्य आपल्या कुटुंबासह मुंबईहून साताऱ्यात आले. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उतरल्यानंतर त्यांना पुसेगावला जायचे होते. चौकात उभ्या असलेल्या सफारी गाडीमध्ये सर्वजण बसले. काही अंतर पुढे गेल्यानंतर गाडीमध्ये अज्ञाताने त्यांच्या बॅगमधून रोकड आणि सोने काढून घेतले. मात्र, हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही.

दरम्यान, क्षेत्र माहुलीजवळ पोहोचल्यानंतर संबंधित सफारी गाडी चालकाला अचानक साताऱ्यात यावे लागले. त्यामुळे ते दाम्पत्यही त्यांच्यासोबत परत आले. बसस्थानकात गेल्यानंतर बॅगमधील दागिने गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Web Title: Jewelry lengthened, with cash from the couple's bag