VIDEO - ताबा सुटल्याने जीप कोसळली नीरा कालव्यात; एकजण वाहनात अडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 09:36 IST2017-12-14T09:32:39+5:302017-12-14T09:36:33+5:30
पुणे-पंढरपूर मार्गावर फलटण तालुक्यातील धुळदेव हद्दीतील रावरमोशी येथे नीरा कालव्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक जीप कोसळली.

VIDEO - ताबा सुटल्याने जीप कोसळली नीरा कालव्यात; एकजण वाहनात अडकला
सातारा - पुणे - पंढरपूर मार्गावर फलटण तालुक्यातील धुळदेव हद्दीतील रावरमोशी येथे नीरा कालव्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक जीप कोसळली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. जीपमधील सहाजणांनी पोहून किनारा गाठला. मात्र एकजण पाण्यातील वाहनात अडकून पडला.
फलटण शहर पोलिस व क्रेनच्या मदतीने वाहन काढण्याच काम सुरू आहे. सर्व प्रवासी हे नांदेड जिल्ह्यातील असून गवंडी काम करण्यासाठी महाबळेश्वर येथे आले होते. साहित्य आणण्यासाठी महाबळेश्वर येथून नांदेड जिल्ह्यात निघाले होते.