शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जयकुमार गोरेंच्या पीएकडून त्या महिलेविरोधात खंडणीची तक्रार

By admin | Updated: January 23, 2017 22:38 IST

आमदार जयकुमार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर तक्रार दाखल करण्यात आली

 आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 23 माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर तक्रार दाखल करण्यात आली. प्रदीप जाधव (दहिवडी), विवेकानंद सावंत (नवी मुंबई) आणि सातारा येथील महिलेवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाल्याने आमदार गोरेंवर दाखल असलेल्या विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. 
आमदार जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग, मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठविणे हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी आमदार गोरे यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात येऊन अटकही झाली होती. संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सोमवारी आमदार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांनी प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत आणि सातारा येथील एका महहिलेविरोधात तक्रार दाखल केली. 
अभिजित काळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषद निवडणुकीत राष्टÑीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. या निवडणुकीत शेखर गोरे यांचा पराभव झाला. त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न दुसºयांदा धुळीस मिळाले. त्यामुळे विरोधक आमदार गोरेंना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रदीप जाधव यांनी माझ्याशी संपूर्ण साधून व दहिवडी येथे समक्ष भेटून तुम्ही विवेकानंद सावंत यांना ठराविक द्या. रक्कम न दिल्यास आम्ही आमदार गोरेंना एका महिलेच्या मदतीने खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करू, असे सांगितले. 
प्रदीप जाधव यांच्या सांगण्यावरून मी विवेकानंद सावंत यांच्याशी नवी मुंबई येथील रघुलीला मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये चर्चा केली. मला त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली. आमदार गोरे यांचे सातारा जिल्ह्यातील विरोधक त्या महिलेला मोठ्या रकमा देण्याचे आश्वासन देत आहेत, असे सावंत यांनी मला सांगितले. त्यानंतर प्रदीप जाधव यांनी मला दहिवडी येथे सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत पुढे काय झाले, अशी विचारणा केली. लवकर रक्कम देऊन विषय संपवा, असेही सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी त्या महिलेने मला व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज करुन भेटण्यासंदर्भात विचारले. १ आॅक्टोबर २०१६ रोजी मला सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे भेटण्यास बोलविले. त्यावेळी महिलेने सावंत यांच्याशी झालेली चर्चा परत नसल्याचे व लीगल प्रोसेस करण्याची धमकी दिली, अशाप्रकारे प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत आणि महिलेने संगनमत करुन आमदार गोरेंना खोट्या केसमध्ये अडकविण्याची भीती घालून, मोठ्या रकमेची मागणी करुन वसूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत अभिजित काळे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात ब्लॅकमेलिंग व खंडणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंडसंहिता १८६० नुसार कलम ३२५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करून घेतला. या गुन्ह्याच्या तपास सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे करत आहेत.