शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जावळीत सुनेत्रा शिंदे यांच्या सत्तेला हादरा

By admin | Updated: February 9, 2015 00:42 IST

संचालकांनी दाखविला हिसका : मध्यवर्ती बँक उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

कुडाळ : जावळी तालुका खरेदी-विक्री संघाची सत्ता सुनेत्रा शिंदे यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या मनमानी कारभार व वन मॅन शो कामकाजाला कंटाळलेल्या खरेदी-विक्री संघातील संचालकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर सहकारी संस्थांसाठी मतदार प्रतिनिधी म्हणून सुनेत्रा शिंदे यांच्या विरोधात ठराव करून चांगलाच हिसका दाखविला.प्रथम जिल्हा परिषद निवडणुकीत पुत्र सौरभ शिंदे यांचा पराभव तर आता संघातील विरोधी ठरावामुळे शिंदे यांच्या राजकीय सत्तेला चांगलाच हादरा बसला आहे. पुण्यात बसून राजकारण करणाऱ्या सुनेत्रा शिंदे यांनी कात्रज घाट ओलांडून येऊच नये, अशी राजकीय बांधणी तालुक्यातील राजकारणात झालेली पाहायला मिळत आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेत आतापर्यंत दिवंगत लालसिंगराव शिंदे, दिवंगत राजेंद्र शिंदे यांनी तालुक्यातून प्रतिनिधीत्व केले होते. राजेंद्र शिंदे यांच्या नंतर सुनेत्रा शिंदे यांना संधी मिळाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहकार शशिकांत शिंदेंना रुचत नाही म्हणणाऱ्यांना आमदार शिंदे यांनी सोसायटी मतदार संघातून जाऊन चांगलाच हिसका दाखविला. पर्यायाने सुनेत्रा शिंदे यांना महिला प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली. मात्र यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुनेत्रा शिंदेंना येता येऊ नये, या उद्देशानेच राष्ट्रवादी कामाला लागलेली पाहायला मिळत आहे.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकी प्रचारावेळी कुडाळमध्ये सुनेत्रा शिंदे यांच्या घरी स्नेहभोजन करून गेले; परंतु जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांच्याशी जुळवून घेतलेले पाहायला मिळाले नाही. बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत आमदार शिंदे यांनी आक्रमक होऊन सोसायटी मतदार संघावर आपली पकड निर्माण केली आहे. खरेदी-विक्री संघातील ठरावही सुनेत्रा शिंदेंना घेता न आल्याने त्यांच्या बँकेच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे त्यांचे सहकारातील अस्तित्व देखील धोक्यात आले असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)संघातील शिंदेंच्या मनमानीला संचालकांचा चापजावळी खरेदी-विक्री संघात सुनेत्रा शिंदे यांच्या मनमानीला, हुकूमशाहीला संचालक कंटाळलेले होते. संचालकांनी विशेष सभेपूर्वीच चंद्रकांत तरडे (इनामदार) यांच्या नेतृत्वाखाली सुनेत्रा शिंदे यांच्याविरोधात ठराव घेण्याची व्यूहरचना आखली व ती यशस्वी केली. मध्यवर्ती बँकेसाठी स. म. बेलोशे यांचा सुनेत्रा शिंदे यांच्या विरुद्ध मतदानातून (९-३) ठराव झाला. किसन वीर कारखान्यासाठी सुभाष फरांदे यांना नऊ मते तर सुनेत्रा शिंदे यांना तीन मते. प्रतापगड कारखान्यासाठी दत्तात्रय घाटगे यांचा सर्वानुमते ठराव करण्यात आला. आमदार शिंदे समर्थकांनी या ठरावात बाजी मारून सुनेत्रा शिंदे यांचे राजकारणातील अस्तित्वच संपुष्टात आणले आहे.