शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

भावाला जामीन दिल्यानेच माझ्यावर ही वेळ !

By admin | Updated: January 17, 2017 00:13 IST

जयकुमार गोरे : दहिवडीच्या सभेत बंधू शेखर गोरे यांच्यावर कडाडून टीका; खोटा गुन्हा ही आयुष्यातील दुर्दैवी घटना

दहिवडी : ‘लाखो रुपये खर्च करून मी त्यावेळी बनावट नोटांच्या आरोपातून जामीन मिळवून देण्याचे पाप केले नसते तर माझ्यावर आज ही वेळ आली नसती, या शब्दात आमदार जयकुमार गोरे यांनी बंधू शेखर गोरे यांच्यावर कडाडून टीका केली. दरम्यान, जिल्ह्यात वाढत चाललेले वर्चस्व आणि जिल्हा बँकेतील हस्तक्षेप नको असल्यानेच रामराजे यांच्या मदतीने माझ्यावर खोट्या केसेस सुरू आहेत. माझ्यावर आणखी पन्नास केसेस झाल्या असत्या तरी चालल्या असत्या; पण शरीर सुखाची मागणी ही माझ्यावर झालेली खोटी केस माझ्या आयुष्यातील दुर्दैवी घटना आहे,’ अशी खंत आमदार गोरे यांनी व्यक्त केली.दहिवडी येथील बाजारपटांगणावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रणजितसिंह नाईक-निंबाळकर, कऱ्हाड बाजार समिती सभापती हिंदुराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य किरण बर्गे, भीमराव पाटील, धैयशील कदम, दिगंबर आगवणे, डॉ. सुरेश जाधव, मानाजी घाडगे, अजय धायगुडे, गुरुदेव बरदाडे, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.जयकुमार गोरे यांनी शेखर गोरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘या माणसाने पात्यात कमावलं ते मातीत घालवलं. हे जेथे जातील तेथे पराभव होतो. आमच्याकडे आले आमचा पंचायत समितीत पराभव झाला. त्यानंतर जिल्हा बँकेत तात्यांचा पराभव. हे जाणकरांकडे होते तो पर्यंत त्यांनाही मंत्रिपद नव्हते. आता, राष्ट्रवादीतही ६४ मतांनी पराभव झाला. जिकडे जाईल, तिकडे पराभव. म्हसवडच्या सभेत म्हटलं, माण तालुक्याला दोन आमदार मिळाले असते; पण भावामुळे पराभव झाला. जिल्हा बँकेला विधानसभेला भाऊ आठवला नाही. जो माणूस स्वत:च्या वडिलांवर गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात बसतो त्यांनी भावालाही सोडले नाही. रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘हजारो टन कोळशातून एक हिरा मिळतो. तो जयकुमार गोरे यांच्या रूपाने मिळाला आहे. आमदार गोरे हे स्वच्छ राजकारण करणारे मित्र आहेत. म्हसवडला कामे करूनही सत्ता मिळाली नाही ही गोष्ट मनाला चटका लावणारी होती.’ यावेळी धैयशील कदम, भीमराव पाटील, सुरेश जाधव, अ‍ॅड. गुंडगे, अर्जुन काळे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी सुरेश जगदाळे, गौरव सावकार, नीलेश माने, अजित भोसले, महेश गुरव, सभापती अतुल जाधव, अरुण गोरे भगवान गोरे, सोनिया गोरे, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, एम. के. भोसले, नितीन दोशी, सोमनाथ भोसले, दादा काळे, प्रशांत वायदंडे, विशाल बागल, निवृत्ती जगदाळे, नगराध्यक्षा साधना गुंडगे, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, धनाजी जाधव, सतीश जाधव, बाबा हुलगे, अजित दडस, रवी संकुडे, शिवाजी शिंदे, महेश कदम व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी) ... तर स्वत:ला गोळी घालून घेईन‘ज्यांनी दोन लाखांचे एक काम आणले नाही, ज्या गावात कमान. त्या गावचे वाटोळे झाले. ज्याला ८७ रुपयांचा नेट पॅक टाकायला पैसे नव्हते त्याच्या खात्यात २५ लाख कसे. माझ्यावर गुन्हा दाखल करताना रामराजे यांचे व चपराशी यांचे किती फोन झाले ते ही तपासा. प्रत्येक निवडणुकीला जयकुमार ऐकत नाही म्हटलं की खोट्या केसेस दाखल करतात. जो पर्यंत माझ्यावर जनतेचा विश्वास आहे तो पर्यंत मला भीती नाही. मी दोषी असेन तर स्वत: गोळी घालून घेईन. ही कमरेखालची लढाई असून, मी काय शिष्टाचाराने वागायचा ठेका घेतला नाही. आपणावर जर केसेस दाखल कराव्या लागण्याची वेळ आली तर ५० युवक पुढे येतील. आता विचाराची लढाई संपली आहे. एकदा मैदानात या मग दावतो जयकुमार काय आहे ते, असे आवाहन त्यांनी रामराजे यांना केले.जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची हजेरीदहिवडी येथे झालेल्या सभेत जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कॉँग्रेस पदाधिकारी सभेला हजर झाल्याचे पहावयास मिळाले. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सभेला कार्यर्त्यांची संख्याही लक्षणीय होती.