शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

साजूरच्या शाळेस ‘आयएसओ’ मानांकन

By admin | Updated: November 2, 2015 23:57 IST

उपक्रमात अग्रेसर : दर्जेदार शिक्षणाने गुणवत्ता वाढीस

तांबवे : गुणवत्तापूर्वक विद्यार्थी व दर्जेदार शैक्षणिक सुविधा असल्यास ग्रामीण भागातील शाळा ‘आयएसओ’ मानांकन ठरू शकते. शहरातील खासगी शाळेतील सुविधांनाही मागे टाकण्याचे काम ग्रामीण भागातील शाळा करतात. असेच काम कऱ्हाड तालुक्यातील साजूर येथील जिल्हा परिषद शाळेने केले आहे. दर्जेदार शैक्षणिक सुविधांबरोबर गुणवत्ताही चमकून तालुक्यातील इतर शाळांच्या तुलनेत ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त करणारी ही शाळा ठरली आहे. या शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा, ई-लर्निंग,सुसज्ज प्रयोगशाळा, १९ संगणकांचा कक्ष, एक हजाराहून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय, गांडूळखत प्रकल्प, ठिबक सिंचन, सौरऊर्जा प्रकल्प, वॉटर प्युरिफायर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्वच्छ गणवेशधारी विद्यार्थी तसेच अनुभवी शिक्षक अशा सुविधांसह अनेक पर्यावरणाचे उपक्रम राबविले जातात. डिजिटल पद्धतीने संगणकीय शिक्षणाबरोबर उत्तम प्रकारचे संस्कारही या शाळेतील विद्यार्थ्यांच्यावर येथील शिक्षकांकडून केले जातात. जिल्हा परिषदेची शाळा असूनही खासगी शाळांनाही विविध शैक्षणिक उपक्रम व सुविधांच्या बाबतीत या शाळेने मागे टाकले आहे. शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक प्रभाकर मोरे, पदवीधर शिक्षक राजाराम कारंडे, उपशिक्षक संतोषकुमार कांबळे, शिक्षिका विजया ताटे, सुलभादेवी पाटील, वैशाली यादव, सरपंच शीतल मुळगावकर, उपसरपंच संदीप पाटील आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आहेत. (वार्ताहर)