शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

कोरोनाला निमंत्रण : वाईच्या बाजारात मरणाची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 7:29 PM

CoroanVirus Satara : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यात प्रशासनाने सकाळी सात ते अकरा ही भाजीपाला व इतर घरगुती वस्तू खरेदीसाठीची वेळ ठरवून दिलेली आहे, गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने मुख्य भाजी मंडई बंद करून प्रत्येक प्रभागात भाजी विक्रीस परवानगी दिली आहे. या वेळेत शहरातील व ग्रामीण भागातील लोक जीवनावश्यक वस्तू, भाजी व इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतानाचे चित्र वाई शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देकोरोनाला निमंत्रण : वाईच्या बाजारात मरणाची गर्दी! जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकं उतरतायत रस्त्यावर!

वाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यात प्रशासनाने सकाळी सात ते अकरा ही भाजीपाला व इतर घरगुती वस्तू खरेदीसाठीची वेळ ठरवून दिलेली आहे, गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने मुख्य भाजी मंडई बंद करून प्रत्येक प्रभागात भाजी विक्रीस परवानगी दिली आहे. या वेळेत शहरातील व ग्रामीण भागातील लोक जीवनावश्यक वस्तू, भाजी व इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतानाचे चित्र वाई शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.लोक कोरोना आजाराचे गांभीर्य विसरल्यासारखे रस्त्यावर येतायत, खरेदीसाठी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी धावताना दिसत आहेत. पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून वेळ वाढवावी, अन्यथा घरपोच सेवा द्यावी. वेळ कमी असल्याने लोक रस्त्यावर उतरून कोरोनाला निमंत्रण देत आहेत.

प्रशासनाला कोरोना साखळी तोडायची आहे, की तशीच कायम चालू ठेवायची आहे, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात न येणारी गोष्ट आहे, अकरानंतर रस्त्यावर प्रचंड शांतता असते; परंतु आधी दोन तास झालेली गर्दी कोरोनाला टाळू शकत नाही, कोरोना वेळ सांगून समाजात फिरत नाही, हे प्रशासनाने लक्षात घेण्याची बाब आहे.

नियम तयार करताना कोणते निकष वापरण्यात येतात, हे समजण्यापलीकडचे आहे. सकाळी नेहमीप्रमाणे नागरिकांनी गर्दी केल्यास प्रशासनाने व पोलिसांनी त्यांना तत्काळ अटकाव करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत बाजार बंद करायला हवा, बँका, मेडिकल्स, किराणा मालाची दुकाने, पेट्रोल पंप, दुकानांमधून गर्दी सुरू आहे.अनेक बँकांमध्ये गर्दी...बँका सुरू असल्या तरी व्यवहारांच्या नावाखाली बँकांना गर्दीवर अंकुश ठेवता आला नाही. सरकारी बँकेत गर्दी होत आहे. परंतु खासगी बँकांची वेळ कमी केली आहे. बाजार समितीमध्ये शेतकरी माल घेऊन आल्याने गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी भाजी खरेदीच्या बहाण्याने झुंबड उठविली होती. प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाही.मुंबई-पुण्याहून आलेल्यांची यादी करणे गरजेचे..कोरोनाने मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासन गोंधळून गेले आहे. ग्रामीण भागातील नागरिक उन्हाळ्याची सुटी लागल्यासारखे वावरताना दिसत आहेत. पोलीस पाटलाने मुंबई-पुण्याहून आलेल्यांची फक्त यादी तयार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात लोकांना हटकल्यास वाद होताना दिसत आहेत. शहरातून येणाऱ्या लोकांवर कसलेही बंधन नाही आणि तेच कोरोना वाढीस निमंत्रण देत आहे. कोरोना साखळी तोडायची झाल्यास नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारSatara areaसातारा परिसर