शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

करून दाखवतो.. एकदा संधी द्या; सातारा जिल्ह्यातील ३२ इच्छुकांनी शरद पवार यांना घातली उमेदवारीसाठी गळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 12:20 IST

उशिरापर्यंत मुलाखती सुरू

सातारा : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ३२ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी (दि. ८) पुणे येथे खुद्द पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतल्या. खासदार पवार यांनी इच्छुकांचा अजेंडा, जाहीरनामा जाणून घेतला. यावेळी आम्ही अनेक वर्षांपासून मतदारसंघात तयारी करत असून, एकदा संधी द्या. माझ्या रूपाने एक आमदार नक्की आपल्याला मिळेल, असा विश्वास देत इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली.सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामार्फत विधानसभा निवडणुकीकरिता ३२ इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार फलटणमधून राजेंद्र पाटोळे, अभय वाघमारे, लक्ष्मण बापूराव माने, अमोल आवळे, दिगंबर आगवणे, वैभव पवार, रमेश आढाव, बुवासाहेब हुंबरे, राजेंद्र काकडे, प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे, अनिल जगताप, घनश्याम सरगर, बापूसाहेब जगताप, नंदकुमार मोरे, सूर्यकांत शिंदे, आशिष सरगर, वाईतून दत्तात्रय ढमाळ, अनिल बुवासाहेब जगताप, डॉ. नितीन सावंत, रमेश धायगुडे पाटील, कैलास जमदाडे, यशराज मोहन भाेसले, नीलेश डेरे, माण-खटावमधून सूर्यकांत राऊत, नितीन देशमुख, प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, अभयसिंह जगताप, अनिल देसाई, सातारा-जावलीसाठी सातारा-जावली मतदारसंघातून शफिक कासम शेख, दीपक पवार, अमित कदम, तर कोरेगावातून आमदार शशिकांत शिंदे, कऱ्हाड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील, कऱ्हाड दक्षिणसाठी सविनय कांबळे आणि पाटणसाठी सत्यजित पाटणकर अशा ३६ जणांनी मुलाखती दिल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते.शरद पवार यांच्या निर्णयाकडे लक्षइच्छुकांनी आपल्या मतदार संघाची बारीक-सारीक अद्ययावत माहिती घेऊन ठेवली होती. या मुलाखती पार पडल्यानंतर आता यावर पक्ष आणि पक्षाचे नेते शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता उमेदवारांना लागली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरvidhan sabhaविधानसभाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस