ट्रक-दुचाकी अपघातात इंदापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी ठार, ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 18:52 IST2022-04-09T18:50:58+5:302022-04-09T18:52:21+5:30
पिंपोडे बुद्रुक : भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी साताराकडे जात असताना शुक्रवारी (दि ८) लोणंद-सातारा महामार्गावरील अंबवडे चौकाजवळ ...

ट्रक-दुचाकी अपघातात इंदापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी ठार, ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात
पिंपोडे बुद्रुक : भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी साताराकडे जात असताना शुक्रवारी (दि ८) लोणंद-सातारा महामार्गावरील अंबवडे चौकाजवळ ट्रक-दुचाकी अपघातात ठार झाले. श्रीकांत रवींद्र शिंदे असे मृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत वाठार पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत शिंदे हे दुचाकी (एमएच-४२-एक्स-५८१०) ने साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. दरम्यान अंबवडे चौकात साताराच्या दिशेने जाणारा ट्रक (एचआर-६५-ए- ३३८४) ने त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलीस घटनास्थळी पोहचले. मृत डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या अपघाताची माहिती अंबवडे येथील पोलीस पाटील अमर गिरी यांनी दिली. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलिसांनी ट्रकचालक बलजित जगतार (रा. हरयाणा) याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस अंमलदार किशोर गिरी करीत आहेत.