शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

एसटी बंद पडण्याच्या सत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:35 IST

सातारा : आगारातील गाड्या काही किलोमीटर गेल्यावर बंद पडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त होत आहेत. ...

सातारा : आगारातील गाड्या काही किलोमीटर गेल्यावर बंद पडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त होत आहेत. सातारा-स्वारगेट-सातारा ही गाडी महामार्गावर बंद पडली होती. त्यामुळे पाठीमागून आलेल्या एसटीने प्रवासी निघून गेले. पण, तोपर्यंत त्रास सहन करावा लागला.

(२१सातारा-एसटी)

------------

मंडईसमोर खड्डा

सातारा : पोवई नाक्यापासून बसस्थानकाकडे जाणारा ग्रेड सेपरेटरचा रस्ता संपतो, तेथे वरून येणारे व भुयारी मार्गातून येणारे रस्ते जुळतात, त्याच ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. रस्तादुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

००००००

बेसुमार वाळू उत्खनन

सातारा : सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी वाळू उत्खनन विनापरवाना केला जात आहे. बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सातत्याने कारवाई केली जाते. पण, उपसा केलाच जात आहे. ही कामे शक्यतो रात्री घडत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. संबंधितांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

०००००००

जीवघेणा मांजा

सातारा : साताऱ्यातील चायनीज मांजा हद्दपार करण्याबाबत वारंवार मागणी केली जात होती. मात्र, तरीही चोरून, लपूनछपून या मांजाची विक्री केली जात आहे. हा मांजा लवकर तुटत नसल्याने मुलांमधून त्याला मागणी आहे. मात्र, हा मांजा पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. संबंधितांवर वेळीच कारवाईची गरज आहे.

०००००००

गुटख्याची विक्री सुरू

सातारा : शाळा-महाविद्यालयांतून ठरावीक अंतरात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करता येत नाही. मात्र, तरीही राजरोसपणे गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

००००

दगड बनले वजन

सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानक व जुन्या मोटार स्टॅण्ड परिसरात भाजी विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी डिजिटल वजनकाटे वापरत आहेत. मात्र, तरीही काही लोक कापडामध्ये दगड बांधून त्यांचा वजनमापे म्हणून वापर करत आहेत. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच फसवणूक होत असते.

०००००००००

कोरेगाव रस्त्यावर रेतीमुळे अपघात

सातारा : कोरेगावकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्याच्या मार्गावर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर बारीक खडी पडलेली आहे. या ठिकाणाहून येणाऱ्या सुसाट गाड्या, दुचाकी वाहने घसरत असल्यामुळे अपघात सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणची रेती काढावी, अशी मागणी केली जात आहे.

०००००

चलनावरून अफवा

सातारा : चलनातून पाच रुपयांची नोट बंद झाली असल्याची तसेच दहाचा ठोकळा घेण्यास काही व्यापाऱ्यांकडून नकार दिला जात आहे. यावरून ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये सातत्याने वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

०००००००००

बागेभोवती रिक्षा

सातारा : साताऱ्यातील गोलबागेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी रिक्षाथांबा मोठा आहे, तरीही काही रिक्षाचालक बागेच्या भोवतीच रिक्षा उभ्या करत असतात. त्यामुळे बागेचे सौंदर्यच दिसत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी ठरवून दिलेल्या परिसरातच रिक्षा उभ्या करण्याची गरज आहे.

०००००

सॅनिटायझरचा विसर

सातारा : कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा सर्वच दुकानांमध्ये सॅनिटायझर वापरण्याची सक्ती केली जात होती. पण, आता विसर पडत चालला आहे. अनेक दुकानांच्या दारात सॅनिटायझरचे स्टॅण्ड लावलेले असतात. मात्र, त्या ठिकाणी सॅनिटायझर रसायन उपलब्ध नसते. त्यामुळे अडचण ठरत आहे.

०००००००००

घाटात कचऱ्याचे ढीग

पेट्री : शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर घाट परिसरात मोठ्या प्रमाणावरील काचा, कागदी बोळे, प्लास्टिक पिशव्यांचा कचरा यामुळे निसर्गरम्य यवतेश्वर घाटाचा श्वास घाणीत घुटमळू लागल्याने या ठिकाणाला स्वच्छतेची प्रतीक्षा लागली आहे.

०००००००

मोहरावर परिणाम

कुडाळ : जावळी तालुक्यात अनेक दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. ढगाळ हवामान, थंडी तर कधी अवकाळीसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. या बदलामुळे फळझाडांना फटका बसत आहे. आंब्याच्या झाडांना आलेला मोहर गळू लागला आहे.

००००००००००

पर्यटकांच्या धूमस्टाइलचा स्थानिकांना धसका

पेट्री : सातारा-कास मार्गावर सुसाट वेगाने काही दुचाकी व चारचाकी वाहनचालक हुल्लडबाजी व स्टंट करत वाहने चालवित असतात. एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हुल्लडबाज पर्यटकांच्या धूमस्टाइलचा स्थानिकांनी धसका घेतला आहे. यापूर्वी अनेक छोटे-मोठे अपघात या मार्गावर घडले आहेत. तसेच हुल्लडबाज व स्टंट करणाऱ्यांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

००००००००

शाळेचे वेध

सातारा : नववी ते बारावीपाठोपाठ पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मित्रांना भेटण्यासाठी कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, पालकांनी संमतीपत्र दिले तरच शाळा सुरू होणार आहेत.

०००००००००

मोबाइल चोरीत वाढ

सातारा : साताऱ्यात जुन्या मोटार स्टॅण्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर आठवडा बाजार भरत असतो. यासाठी ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. या गर्दीचा फायदा घेऊन काही जण मोबाइल चोरी करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

०००००००००००

साइडपट्ट्या तत्काळ दुरुस्तीची मागणी!

पेट्री : सातारा-बामणोली मार्गावर कास तलावाकडे जाताना कास पठाराच्या तीव्र उतारावर गेल्या वर्षी अतिवृष्टीने तसेच यंदाच्या वादळी व परतीच्या पावसाने रस्त्याच्या डाव्या बाजूची साइडपट्टी बऱ्याच ठिकाणी खचली आहे. मार्गावरील वाहतूक धोकादायक आहे. तीव्र उतार, धोकादायक वळण व अरुंद रस्ता असल्याने अपघाताची शक्यता वाढत आहे. संबंधित विभागाने रस्त्याच्या साइडपट्ट्यांची दुरुस्ती करून रिफ्लेक्टर व सूचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.