असुविधांचा कल्ला, अर्धा कोटीचा गल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:48 PM2019-11-12T23:48:22+5:302019-11-12T23:48:27+5:30

प्रगती जाधव-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टोलनाका कार्यक्षेत्रातील २० किमी अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन ...

An inconvenience rush, a half a million rug | असुविधांचा कल्ला, अर्धा कोटीचा गल्ला

असुविधांचा कल्ला, अर्धा कोटीचा गल्ला

Next

प्रगती जाधव-पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : टोलनाका कार्यक्षेत्रातील २० किमी अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन सोयीसाठी रुग्णवाहिका असणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र यातील कोणतीही सुविधा खेडशिवापूर- आनेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर उपलब्ध नाही. प्रचंड असुविधा असतानाही या टोलनाक्यांवरून विक एंडला चक्क ५० लाखांहून अधिक टोल संकलन होत असल्याची माहिती आहे.
पुण्याहून सातारा, कोल्हापूर आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यांकडे जाण्यासाठी खेडशिवापूर, आनेवाडी आणि तासवडे असे तीन टोलनाके येतात. तर कोल्हापूरकडे जाताना किणी टोलनाका लागतो. हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अनेक अवजड वाहने, मालवाहतूक करणारे ट्रक, पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करणारे, व्यावसायिक दौरे करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या महामार्गावर कायम वर्दळ असते.
महामार्गावर कोणताही अपघात झाला तर टोलनाका परिसरात त्याची माहिती देणं अपेक्षित असतं. त्यानंतर तातडीने अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचार देण्याची व्यवस्था करून मग रुग्णांना पुढे नेणे अपेक्षित आहे. असे असताना टोलनाका परिसरात रुग्णवाहिका किंवा वाहिकेचा चालक यापैकी कोणीतरी नेहमीच गायब असतं. त्यामुळे गरजेच्यावेळी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत.
पुण्याहून खेडशिवापूर, आनेवाडी आणि तासवडे या टोलनाक्यांवर दिवसाला सरासरी ५० लाखांचा टोल वसूल होतो. सण, आठवड्याची अखेर आणि सलग येणाºया सुट्यांमध्ये हा आकडा दिवसाला कोटींच्या घरात जातो. दिवसाला कोट्यवधींचा गल्ला मिळूनही सोयीसुविधांचा कल्ला दिसतो.
महामार्गावरील पादचारी मार्ग थोडाजरी पाऊस पडला तरी पाण्यात जातात. त्यामुळे महामार्गानजीक वसलेल्या गावकऱ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो, अथवा धोका पत्करून महामार्ग ओलांडावा लागतो. रस्ता, भुयारी मार्ग, पूल, सेवा रस्ता ही सर्वच कामे जवळपास दीड वर्षापासून ठप्प आहेत.
वाहनधारकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी टोलवसुली ही बंधनकारकच आहे. अपुºया कामांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. एखादा अपघात झाल्यास महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदाराने अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी तातडीने क्रेन उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. मात्र, प्रत्येकवेळी खासगी क्रेनच मागविली जाते. या क्रेनचे भाडे संबंधित वाहनचालकांकडूनच वसूल केले जाते. अशाप्रकारे वाहनधारकांना भुर्दंडही सहन करावा लागत आहे. सुविधांची वानवा असूनही जीव मुठीत धरुन या मार्गावरुन प्रवास करावा लागतो. तरीही टोलची वसुली मात्र नियमितपणे सुरु आहे.

वाहकाशिवाय उभी असते रुग्णवाहिका
टोलनाका परिसरात अपघात झाल्यानंतर तेथे अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार किट असणं बंधनकारक आहे. मात्र, कित्येकदा टोलनाक्यावर वाहकाशिवाय रुग्णवाहिका उभी असते, काहीवेळा रुग्णवाहिकाही गायब असते. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळत नाहीत.

Web Title: An inconvenience rush, a half a million rug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.