Satara: मिळकत देतो म्हणून पावणे दोन लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा नोंद 

By नितीन काळेल | Published: November 17, 2023 05:03 PM2023-11-17T17:03:10+5:302023-11-17T17:03:44+5:30

सातारा : मिळकत तुम्हाला विकत देतो असे म्हणून कमिशनचे ५० हजार आणि रजिस्टेशनसाठी १ लाख ३५ हजार रुपये घेऊन ...

Income fraud of two lakhs, case registered against one in satara | Satara: मिळकत देतो म्हणून पावणे दोन लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा नोंद 

Satara: मिळकत देतो म्हणून पावणे दोन लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा नोंद 

सातारा : मिळकत तुम्हाला विकत देतो असे म्हणून कमिशनचे ५० हजार आणि रजिस्टेशनसाठी १ लाख ३५ हजार रुपये घेऊन खोटी पावती देणाऱ्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संशयित पाडळी, ता. सातारा येथील आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी निकीता गणेश माने (रा. करंजे, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार महेश शंकर ढाणे (रा. पाडळी, ता. सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. १५ आॅक्टोबर २०२२ ते १६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान हा प्रकार घडला आहे. संशयिताने शहरातील मिळकत तुम्हाला विकत देतो म्हणून विश्वास संपादन करत कमिशनचे ५० हजार रुपये घेतले. तसेच रजिस्टेशनसाठी लागणारे १ लाख ३५ हजार रुपयेही घेण्यात आले. 

त्यानंतर त्याने दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नावे खोटी पावती देऊन फसवणूक केली. तर १ लाख ८५ हजार रुपयेही परत दिले नाहीत. त्यावेळी पैशाची मागणी केल्यावर हातपाय तोडीन, तुमच्याविरोधात पोलिस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा नोंद करीन अशी धमकी देण्यात आली, असेही या तक्रारीत स्पष्ट केले आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हवालदार व्ही. एच. गायकवाड हे तपास करीत आहेत

Web Title: Income fraud of two lakhs, case registered against one in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.