खळबळजनक ! जेलमध्ये टाकण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 13:56 IST2018-06-26T13:46:06+5:302018-06-26T13:56:25+5:30
आई-वडिल शेतात गेल्याचे पाहून घरी एकट्या असलेल्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.

खळबळजनक ! जेलमध्ये टाकण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर अत्याचार
सातारा : आई-वडिल शेतात गेल्याचे पाहून घरी एकट्या असलेल्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तेरा वर्षीय शाळकरी मुलगी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अंगणात खेळत होती. अन्य एका दुसऱ्या गावातून आलेल्या नंदू बापू अडागळे (वय ४०, रा. शहापूर, ता. सातारा) याने त्या मुलीला नवीन बांधकाम झालेल्या एका घरात ओढत नेले.
हा प्रकार कोणाला सांगितलास तर पोलिसांना सांगून तुला जेलमध्ये टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने संबंधित मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, सायंकाळी आई-वडिल शेतातून परत आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आई-वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन नंदू अडागळे याच्यावर गुन्हा दाखल केला.
अडागळे हा सध्या फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. चव्हाण हे तपास करीत आहेत.