शाळकरी मुलीवर अत्याचार

By admin | Published: July 26, 2016 02:19 AM2016-07-26T02:19:02+5:302016-07-26T02:19:02+5:30

ओळखीच्या तरुणाने शाळकरी मुलीला मैत्रिणीमार्फत नातेवाईकाच्या घरात बोलवून पाशवी बलात्कार केला.

School girl tortured | शाळकरी मुलीवर अत्याचार

शाळकरी मुलीवर अत्याचार

Next

आरोपीला अटक : नंदनवनमधील घटना
नागपूर : ओळखीच्या तरुणाने शाळकरी मुलीला मैत्रिणीमार्फत नातेवाईकाच्या घरात बोलवून पाशवी बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. मुलीला असह्य वेदना झाल्याने उशिरा रात्री ही संतापजनक घटना उघडकीस आली. मुलीच्या आईने मध्यरात्री तक्रार नोंदविताच पोलिसांनी आरोपी राहुल बबनराव भिवगडे (वय २२, रा. पारडी) याला अटक केली.

आरोपीची मुलीला धमकी
शाळकरी मुलीवर अत्याचार

नागपूर : इमामवाड्यातील शाळकरी मुलीच्या बलात्काराची घटना ताजीच असताना पुन्हा शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.
पीडित मुलगी १६ वर्षांची असून, १० वीत शिकते. तिला वडील नाहीत. दोन मोठ्या बहिणी आणि आईसह ती भाड्याच्या घरात राहते. आई धुणीभांडी करून उदरनिर्वाह करते. पीडित मुलीच्या घरमालकासोबत आरोपी राहुल भिवगडेचे नातेसंबंध आहेत. त्यामुळे तो नेहमीच तेथे येतो. त्यामुळे आरोपीची पीडित मुलीसोबत ओळख आहे. कधी कधी तो पीडित मुलीच्या घरीही येत होता. रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास तो नेहमीप्रमाणे नातेवाईकाच्या घरी आला.
तेरवीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरमालक आणि त्याचा परिवार बाहेर गेले होते. त्याने एका मैत्रिणीमार्फत निरोप देत पीडित मुलीला नातेवाईकांच्या घरी बोलवले. ती घरात आल्यानंतर दार बंद करून तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. दरम्यान, रात्री १० च्या सुमारास असह्य वेदना होत असल्यामुळे पीडित मुलगी रडू लागली. आईने विचारणा केली असता तिने पोटात दुखत असल्याचे खोटेच सांगितले. आईने तिला डॉक्टरकडे नेले. पोटदुखीचे औषध घेऊन ती परत आली. मात्र, तिला वेदना होत असल्याने औषधाचा फायदा झाला नाही. रात्री ११.१५ ला ती असह्य वेदनांनी रडू लागल्यानंतर आईने तिला बघितले. त्यानंतर हा गंभीर प्रकार आईच्या लक्षात आला. पीडित मुलीला घेऊन आई लगेच नंदनवन पोलीस ठाण्यात पोहचली. रात्री ११.३० ला पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

अटक आणि पोलीस कोठडी
शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नंदनवन ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार सुनील महाडिक, महिला उपनिरीक्षक बावनकर यांनी आरोपीच्या घराचा पत्ता मिळवला. त्यानंतर रात्री १२.३० च्या सुमारास त्याला त्याच्या घरी झोपेतच जेरबंद करण्यात आले. त्याला सोमवारी कोर्टात हजर करून त्याचा २७ जुलैपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला. आरोपी राहुल सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानात नोकर असून, त्याच्यावर यापूर्वी कुठे काही गुन्हे दाखल आहेत काय, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: School girl tortured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.