शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाठार स्टेशनला कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:38 IST

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन येथील शिवसाई मंगल कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते कोरोना केअर सेंटरचे ...

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन येथील शिवसाई मंगल कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, वाठार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे, मंगेश धुमाळ, उपसभापती संजय साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र जाधव, सरपंच नीता माने, उपसरपंच अनिल माने उपस्थित होते.

वाठार स्टेशन परिसरात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, काही गावे हॉटस्पॉट बनली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. तरीही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाठार स्टेशन येथे तीस बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरणाची सोय करण्यात येणार आहे.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अंकुश जाधव, माजी उपसरपंच नागेश जाधव, माजी सरपंच अमोल आवळे, भीमाशंकर अहिरेकर, संजय भोईटे, मंडल अधिकारी उमेश डोईफोडे, तलाठी नामदेव नाळे, एम. एस. शिंदे, एच. एस. गवळी, ए. एच. घुगे, ए. एन. जाधव उपस्थित होते.

फोटो

वाठार स्टेशन येथे नवीन कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, क्रांती बोराटे उपस्थित होते. (छाया : संजय कदम)