उमेदवारी द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी; उदयनराजेंसमोर समर्थकाची अजब मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:20 IST2026-01-19T20:18:37+5:302026-01-19T20:20:10+5:30
खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिरवर रविवारी एक अजब प्रकार पाहायला मिळाला

उमेदवारी द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी; उदयनराजेंसमोर समर्थकाची अजब मागणी
सातारा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारीचा खल सर्वत्र सुरू असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिरवर रविवारी एक अजब प्रकार पाहायला मिळाला. एका समर्थकाने खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमोरच उमेदवारी द्या.नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या, अशी अजब मागणी केली. तेव्हा उदयनराजेंनीही त्याला हसत प्रतिसाद देऊन वातावरण हलकफुलक केलं.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक कार्यकर्ते रविवारी जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी उदयनराजेंसमोर त्यांचा एक समर्थक म्हणाला, मोठ्या गावांच्या उमेदवारीचा विषय आता संपला ना. आता तिकीट द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या. आता आपल्याला महाराज साहेबांसाठी लढायचंय. यावर खासदार उदयनराजे म्हणाले, दोरी आणली का, असं म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.