शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Pune-Bangalore Highway: उंब्रजचा भराव पूलच बनलाय बेकायदा ‘प्रवासी थांबा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:07 IST

महामार्गावरील आणि उपमार्गावरील वाहतुकीचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक

अजय जाधवउंब्रज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील उंब्रज येथील भराव पूल हाच बेकायदेशीर प्रवासी थांबा बनला आहे. एसटी तसेच खासगी बसचालक या पुलावरच थांबा घेत असल्याने प्रवाशांना नाईलाजाने जीव मुठीत घेऊन येथे उभे राहावे लागत आहे. यापूर्वी या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलेले आहे.उंब्रज येथे महामार्गालगत एसटीचे प्रशस्त बसस्थानक आहे. मात्र बहुतेक एसटी बसेस बसस्थानकात न थांबता थेट महामार्गाच्या भरावपुलावर थांबतात. पुणे-मुंबई मार्गावरील अनेक खासगी बसगाड्यांचा मुख्य थांबाही उंब्रज भरावपूलच बनला आहे.

वाचा : खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावटउंब्रज व पंचक्रोशीतील, पाटण तालुक्यातील चाफळ, तारळे पंचक्रोशीतील शेकडो गावांतील हजारो विद्यार्थी उंब्रज, कराड, सातारा येथील महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज येतात. त्यांना रोजच उंब्रजच्या भराव पुलावर उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्याचबरोबर उंब्रज हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आसपासच्या गावांतील शिक्षक व नोकरदार वर्गालाही ये-जा करण्यासाठी याच ठिकाणी उभे राहावे लागते. त्यामुळे भराव पुलावर प्रवाशांची कायम मोठी गर्दी निर्माण होत असते. अपघात घडत असतात. नुकतेच उंब्रजचे एसटी बसस्थानक नव्याने उभारण्यात आले आहे. मात्र हे एसटीचे बसस्थानक फक्त ‘शोपीस’ बनल्याची परिस्थिती दिसत आहे.उंब्रज भराव पूल हा आधीच मृत्यूचा सापळा ठरत असून, यापूर्वी झालेल्या अनेक अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नुकताच येथे सेगमेंटल पूल मंजूर झाल्याने लवकरच सहापदरीकरणाचे काम सुरू होणार आहे. मात्र हे काम सुरू होण्यापूर्वी महामार्गावरील आणि उपमार्गावरील वाहतुकीचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा वाहतूक कोंडी वाढून अपघातांचे प्रमाण अधिकच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने उंब्रजमधील वाहतूक व्यवस्थेवर तातडीने योग्य तोडगा काढावा. त्यानंतरच सहापदरीकरण व सेगमेंटल पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Umbraj Flyover: Illegal Bus Stop on Pune-Bangalore Highway Sparks Danger

Web Summary : The Umbraj flyover on the Pune-Bangalore highway has become an illegal bus stop, forcing passengers to risk their lives. Accidents have occurred, causing deaths and disabilities. Despite a new bus station, buses halt on the flyover, demanding immediate traffic management before expansion work begins.