शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
5
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
6
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
7
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
8
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
9
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
10
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
11
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
12
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
13
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
14
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
15
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
16
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
17
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
18
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
19
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
20
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

इचलकरंजीत पंचगंगा नदी पुन्हा बनतेय गटारगंगा

By admin | Updated: January 20, 2017 00:12 IST

प्रदूषण प्रश्न : उपसा बंद करावा लागणार; पाणीटंचाईची भीती; आगामी सहा महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन होण्याची गरज

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावली असून, पाण्यात मिसळणारे सांडपाणी आणि कचरा यामुळे पाण्यास दुर्गंधी येऊ लागली आहे. दरवर्षीप्रमाणे नदीतील पाणी प्रदूषित होऊन नगरपालिकेस पुन्हा पाण्याचा उपसा बंद करावा लागणार आहे. आगामी सहा महिने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.दरवर्षी पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावते. त्याचबरोबर ग्रामीण परिसराबरोबर इचलकरंजीतील यशोदा नाला व काळा ओढा यातून सांडपाणी नदीपात्रात येते. त्याचबरोबर नागरिकांनी नदीच्या पाण्यात टाकलेले निर्माल्य, कचरा, आदी कुजल्याने नदीतील पाणी काळे पडते व त्याला दुर्गंधी येते. यंदाही येथील पंचगंगा नदीत तेच घडते आहे. त्यातच नागरिकांनी धुतलेली जनावरे व कपडे धुण्याची भर पडत आहे.अशा पार्श्वभूमीवर राधानगरी किंवा काळम्मावाडी धरणातून सोडलेल्या पाण्याबरोबर कोल्हापूर व ग्रामीण परिसरातील सांडपाणी वाहत येते. त्याचा परिणाम म्हणून येथील नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. असे पाणी पालिकेच्या शुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले तरी त्याचा काळसर रंग व दुर्गंधी कमी होत नाही. अखेर नगरपालिकेला पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा बंद करावा लागतो आणि कृष्णा नदीतील पाणी उपशावरच अवलंबून राहावे लागते. याचा परिणाम म्हणून सध्या तीन दिवसांतून एकवेळ मिळणारे पाणी पाच दिवसांतून एक वेळ मिळते. एकूणच शहरवासीयांना पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार, अशी भीती व्यक्त होत आहे.गतवर्षी पंचगंगा नदीमधील दूषित पाण्याची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचा उपसा बंद होता. त्याच दरम्यान कृष्णा नदीतील पाण्याची पातळीसुद्धा खालावल्यामुळे एप्रिल महिन्यातच नदीपात्रातील इंटकवेलचे व्हॉल्व्ह रिकामे पडले आणि पाणीटंचाई भासू लागली. नदीमध्ये पिण्याचे पाणी सोडावे, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी जोरात प्रयत्न केले. सुरुवातीला नगरपालिका व आमदार हाळवणकरांच्या प्रयत्नांना पाटबंधारे खात्याने दाद दिली नाही. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हस्तक्षेप करून कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकाऱ्यांना समन्वय घडवून आणला. त्यामुळे इचलकरंजीस पाणीपुरवठा करणाऱ्या मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील पाणी उपसा करणाऱ्या नळ योजनेच्या जॅकवेलला पुरेसे होईल इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. यंदासुद्धा पाणीटंचाईच्या तीव्रतेवर उपाय करण्यासाठी आतापासूनच नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. ‘पंचगंगा’ प्रवाही ठेवण्याची मागणीपंचगंगा नदीतील पाण्याचे प्रदूषण कमी व्हावे, याकरिता काळम्मावाडी नदीमध्ये असलेला अतिरिक्त पाणीसाठा नियोजनबद्धरीत्या वारंवार नदीपात्रात सोडून पंचगंगा प्रवाही ठेवली असता दूषित पाण्याची समस्या आणि त्याचबरोबर पाण्याची टंचाई भासणार नाही. याबाबत आतापासूनच नगरपालिका व लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.