शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जनतेस वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकविणार : विराज शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

वाई : ‘वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील काही शासकीय अधिकारी सर्वसामान्य जनतेची कामे न करता तिची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे ...

वाई : ‘वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील काही शासकीय अधिकारी सर्वसामान्य जनतेची कामे न करता तिची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना काँग्रेसच्या माध्यमातून धडा शिकविण्यात येईल,’ असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी रविवारी दिला.

वाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद अनपट, प्रतापराव देशमुख, अतुल संकपाळ, विशाल डेरे, विकास जाधव उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘सध्या काही शासकीय अधिकारी लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून काही त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. शासकीय अधिकारी, बँका, पतसंस्थेचे अधिकारी हे जनतेला नाहक त्रास देतात. सर्वसामान्य जनतेला कोणी वाली राहिला नाही, अशा भ्रमात शासकीय अधिकाऱ्यांनी राहू नये. सध्या लॉकडाऊनमध्ये वाढलेल्या प्रचंड महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. धंदे, व्यवसाय अनेक दिवस बंद असल्याने, रोजगार नसल्याने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. बँका पतसंस्था, सरकारी देणी, घरपट्टी, पाणीपट्टी, भरमसाट आलेली वीज बिले अशा नाना समस्यांचा सामना करता करता सगळी जनता भरडून निघाली आहे. घर चालविणे मुश्किल झालेल्या सर्वसामान्य जनतेला कसलाही दिलासा मिळालेला नाही.’

शिंदे म्हणाले, ‘सध्या सगळ्याच सरकारी कार्यालयांत लोकांची काही अधिकाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक सुरू आहे. सर्वसामान्य लोकांची पैशाअभावी कामे होत नाहीत. हेलपाटे मारून जनता त्रस्त झाली आहे. याचा अर्थ या सरकारी अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिलेला नाही. सर्वसामान्य जनतेची लूट करण्याची परवानगी या अधिकाऱ्यांना कोणी दिली? कोरोनासारख्या संकटामुळे अधिकारी लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे होती; पण तसे होताना दिसत नाही.’