शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीसाठी तुरुंगातही जाईन

By admin | Updated: November 14, 2014 23:17 IST

जयकुमार गोरे : फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास जामीनही घेणार नाही

सातारा : ‘सरकारने बहुमत सिद्ध न केल्यामुळे राज्यपालांच्या आदेशाचेच उल्लंघन झाले आहे. त्यामुळे आपण अभिभाषण करू नये, हे सांगण्यासाठी आम्ही विधानसभेच्या पायरीवर बसलो होतो. तरीही आम्हाला निलंबित केले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी तुरुंगातही जाण्यास तयार आहे,’ असे मत काँग्रेसचे निलंबित आमदार जयकुमार गोरे यांनी केले.विधानसभेतून निलंबित केल्यानंतर जयकुमार गोरे प्रथमच सातारा येथे आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी माण तालुक्यातून शेकडो समर्थक आले होते. गोरे म्हणाले, ‘सत्तेत आलेल्या सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजुरीसाठी मतदान घेणे आवश्यक होते. यामध्ये ठरावाला होय म्हणणारे, नाही म्हणणारे अन् तटस्थ राहणारे किती आमदार, हे पाहणे गरजेचे होते. यासाठी अध्यक्षांकडे मतदानाची मागणी करण्यासाठी माझ्यासह अनेक जण आग्रही होते. आम्ही मागणी करूनही मतदान न घेतल्याने राज्यपालांच्या आदेशाचेच उल्लंघन झाले आहे. त्यामुळे आपण अभिभाषण करू नये, हे सांगण्यासाठी आम्ही राज्यपालांची वेळही मागितली होती. हे सांगण्यासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह असंख्य ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विधानसभेच्या पायरीवर बसलो होतो. राज्यपाल अन् आमच्यात आठ ते दहा फुटांचे अंतर होते. त्यामुळे कोठेही धक्काबुक्की झाली नाही. समितीचा अहवाल येण्यापूर्वीच सूडबुद्धीने निलंबित केले आहे,’ असा आरोपही गोरे यांनी केला.गोरे म्हणाले, ‘लोकशाहीचे पावित्र जपण्यासाठी मी काम करणार आहे. आम्हाला निलंबित करून विधानसभेतील आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी जनतेसमोर म्हणणे मांडायला अडवू शकत नाही. अल्पमतातील सरकार चालविण्यासाठी विरोधातील जास्तीतजास्त आमदार बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत. यासाठी जनआंदोलन उभारून या सरकारचे कृत्य जनतेसमोर आणणार आहे.’ पत्रकार परिषद संपल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील तेथे आले. ते म्हणाले, ‘राज्यपालांना कोणीही धक्काबुक्की केली नव्हती. तेथे अनेक माजी मंत्र्यांबरोबरच साठ ते सत्तरजण होतो. गोरे यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे.’ (प्रतिनिधी)सोशल मीडियावरूनच टीका‘भाजप’ची सत्ता आणण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या सोशल मीडियावरूनच आता भाजपवर टीका होऊ लागली आहे. यासंदर्भात अनेक पोस्ट फिरविली जात आहे, अशी टीका निलंबित आमदार गोरे यांनी केली.