शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात बसून लोकांची कामे कशी होणार?

By admin | Updated: November 1, 2015 23:44 IST

शंभूराज देसार्इंचा टोला : निष्क्रिय कारकिर्दीचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत; शासनाच्या तिजोरीतून निधी खेचून आणावा लागतो

पाटण : ‘पाटणकरांच्या २६ वर्षे आमदारकी व पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतही पाटण तालुक्यात विकासाचा प्रचंड मोठा अनुशेष मागे राहिला आहे. त्यांच्या निष्क्रिय कारकिर्दीचे परिणाम आज जनतेला भोगावे लागत आहेत. मी आमदारकीच्या पहिल्याच वर्षात ९६ कोटींची कामे आणली असून, दरवर्षी असे शेकडो कोटी रुपये आणावे लागतील. त्यासाठी शासनाच्या तिजोरीतून निधी खेचून आणावा लागतो. केवळ वाड्यात बसून जनतेची कामे कशी होणार?,’ असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला. युती शासन आपल्या दारी या स्वत:च्या संकल्पनेतून नियोजन केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तालुक्यातील १६ गावांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, अंगणवाडी आदींसाठी २ कोटी ४४ लाखांचा निधी खर्ची होणार आहे. त्या कामाची भूमिपूजने आमदार देसाई यांच्या हस्ते झाली. आमदार देसाई म्हणाले, ‘पाटणकरांना तालुक्याने नाकारले आणि मी आमदार झालो. आता मला लोकांच्या दारात गेले पाहिजे. मला विकास करायचा आहे. त्यासाठी बारकाईने नियोजन करावे लागणार आहे. तालुक्यातील सामान्य माणसाला बदल जाणवला पाहिजे. म्हणूनच लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी प्रशासन बरोबर घेऊन लोकांच्या दारात जात आहे. २००९ मध्ये माझा पराभव झाला तरीसुद्धा दुसऱ्याच दिवशी मी गावागावांमध्ये फिरलो. मला जय-पराजय याचे काही देणे-घेणे नाही. लोकांच्या व्यथा जाणून घेणारा आमदार म्हणून मला ओळखलं पाहिजे, नाहीतर पाटणकर पितापुत्र पराभवाच्या वर्षपूर्तीनंतर किती वेळा तुमच्या दारात आले, असा सवाल शंभूराज देसार्इंनी जनतेला विचारला. (प्रतिनिधी)  

९५ कोटी आणणारा एकमेव आमदार... सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाटण तालुक्यासाठी वर्षभरात ९५ कोटींचा निधी आणणारा एकमेव आमदार असल्याचा दावा करून शंभूराज देसाई म्हणाले, ‘आमदारकीच्या एका वर्षाची पोचपावती मी जनतेला दिली आहे. ९५ कोटींपैकी एक-एक रुपयाचा हिशेब मी सांगू शकतो.’