संजय बारंगळे यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:39 IST2021-01-13T05:39:49+5:302021-01-13T05:39:49+5:30

सातारा : येथील शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संजय बारंगळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेत्तर ...

Honor of Sanjay Barangale | संजय बारंगळे यांचा सन्मान

संजय बारंगळे यांचा सन्मान

सातारा : येथील शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संजय बारंगळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने पुणे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला. पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत श्रावण देवरे, राष्ट्रीय रोष्टर चळवळीचे अध्यक्ष संदीप फणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यातील अंगणवाडीपासून महाविद्यालयीन होतकरू शिक्षकांना प्रेरणा मिळावी, या हेतूने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याच धर्तीवर सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेने ऑनलाईन पद्धतीने राज्यातील शिक्षकांकडून माहिती मागवून घेतली होती. निवड समितीच्या वतीने संजय बारंगळे यांची, त्यांच्या आजवरच्या शैक्षणिक कामाच्या आधारे निवड केली गेली. त्यांचे समाजातील विविध मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

फोटो आहे..!

................

Web Title: Honor of Sanjay Barangale