ऐतिहासिक महादरे तलाव अखेर तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 06:50 PM2020-08-01T18:50:31+5:302020-08-01T18:51:42+5:30

सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने दोन वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला आहे. त्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झालेली आहे.

The historic Mahadare Lake is finally overflowing | ऐतिहासिक महादरे तलाव अखेर तुडुंब

सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे (छाया : प्रशांत कोळी)

googlenewsNext
ठळक मुद्देऐतिहासिक महादरे तलाव अखेर तुडुंब

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने दोन वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला आहे. त्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झालेली आहे.

सातारा शहराच्या आसपास कोणतीही नदी अथवा मोठा तलाव नाही. पाणी असेल तरच एखाद्या गावाचा, शहराचा विकास होतो. ही बाब ओळखून सातारा शहर बसविणा?्या द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी स्थापत्य तंत्राचा कल्पकतेने वापर करून शहरात पाणी खेळवले. ठिक ठिकाणी दगडांचे हौद आणि तलाव बांधले. यातील एक तलाव म्हणजे महादरे.

प्रतापसिंह महाराज थोरले यांनी १८२९ रोजी महादरे तलावाची उभारणी केली. संपूर्ण दगडी बांधकाम असलेला हा तलाव स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. दोन दशकांच्या कालावधी प्रथमत: सातारा पालिका व जलसंपदा विभागाच्या वतीनेदोन वर्षांपूर्वी तलावातील गाळ बाहेर काढण्यात आला.

या तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे ४ कोटी ७२ लाख ५० हजार लिटर इतकी आहे. मात्र गाळामुळे केवळ ४ कोटी २२ लाख ५० हजार लिटर इतका पाणीसाठा होत होता. गाळ काढण्यात आल्याने यामध्ये पुन्हा ५० लाख लिटरने वाढ झाली आहे.

सातारा तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसावर हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. व्यंकटपुरा पेठ येथील रहिवाशांना या तलावातून दैनंदिन वापरासाठी पाणी पुरवठा केला जात आहे.

पालिकेने लक्ष द्यावे !

महादरे तलाव व परिसर निसर्ग संपन्न आहे. त्यामुळे येथे भटकंतीसाठी येणा?्या नागरिकांची संख्या अधिक आहे. पालिकेने सुरक्षिततेसाठी तलावाला तारेचे कुंपण घातले असले तरी काही हौशी तरुण तलावाच्या कडेला बसूनच मद्यपान करत आहेत. असे प्रकार सातत्याने होत असून, एखादी विपरीत घटना घडण्यापूर्वी पालिकेने मद्यपींवर कारवाई करण्याबरोबरच याठिकाणी गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


 

 

Web Title: The historic Mahadare Lake is finally overflowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.