शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र वितरणातील हिरकणी अरुणा घाडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

प्रसंग कुठलाही असो, त्याला धैर्याने आणि कष्टाने सामोरे जाण्याच्या याचवृत्तीमुळे महिला आज पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत, अशीच एक हिरकणी ...

प्रसंग कुठलाही असो, त्याला धैर्याने आणि कष्टाने सामोरे जाण्याच्या याचवृत्तीमुळे महिला आज पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत, अशीच एक हिरकणी ज्यांनी आपल्या धैर्य आणि कष्टाच्या जोरावर समस्त महिलांसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. संकटावर मात करत यशस्वी उद्योजिका बनल्या त्या म्हणजे कोरेगाव (जि. सातारा) येथील अरुणा मोहन घाडगे.

सध्याच्या युगात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रांत कर्तबगारी गाजवत आहेत. याबाबतीत वर्तमानपत्र वितरण क्षेत्र काहीसे मागे आहे. परंतु कोरेगाव येथील अरुणा घाडगे या वाचकांच्या मागणीप्रमाणे विविध प्रकाशनांची वृत्तपत्रे अर्थात न्यूज पेपर वाचकांना त्यांच्या निवासस्थानी किंवा आस्थापनात गरजू, होतकरू व्यक्तींच्या माध्यमातून दररोज वितरित करीत आहेत. वृत्तपत्र वितरण या सेवा उद्योग प्रकारात मोडणाऱ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या महिलांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांचे हे कार्य पाहता, आता वृत्तपत्र वितरण हे सेवा उद्योग क्षेत्रही मागे राहिले नाही, असे म्हणता येईल.

अरुणा घाडगे यांचा जन्म दहिवली (ता. माढा, जि. सोलापूर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण करमाळा, जि. सोलापूर येथे झाले. ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) या गावचे मुक्तपत्रकार मोहन घाडगे यांच्याबरोबर त्यांचा विवाह २००९ मध्ये झाला. मुक्तपत्रकार मोहन घाडगे यांचा जाहिरात एजन्सीचा व्यवसाय असल्याने आपल्या पत्नीने वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय करावा, अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच एम. ए. प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतलेल्या घाडगे यांनी माजी राष्ट्रपती ए. पी. जे . अब्दुल कलाम, कोथरूड, पुणे येथील ज्ञानदा प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल शिंदे यांच्याकडून वृत्तपत्र वितरणाची एजन्सी सुरू करण्याची प्रेरणा घेऊन लग्नानंतरही कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत याच क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांनी ठरवले.

स्त्री आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, असे वाटले पाहिजे आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करावे, याच उद्देशाने घाडगे यांनी तीन वर्षांपूर्वी स्वत:ची वृत्तपत्र वितरण एजन्सी सुरू केली. या व्यवसायात त्यांना स्थिर होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. यावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कोरेगाव येथील वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय बंद पडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यावेळी धन्वंतरी पतसंस्थेचे माजी संचालक, कोरेगाव गामपंचायतीचे माजी सदस्य, डॉ. प्रदीप बर्गे यांचे मार्गदर्शन, पती मोहन घाडगे व त्यांच्यासोबत वितरणाच्या कामामध्ये मदत करणारे सर्व सहकारी यांच्या मदतीने त्यांनी हा व्यवसाय चालूच ठेवला. सुरुवातीला त्यांनी वाचकांची मागणी लक्षात घेऊन विविध वृत्तपत्र कार्यालयांकडून एजन्सी घेऊन अंकांचे वितरण करत असत. हळूहळू हे काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की नुसते वृत्तपत्रे मागवून वितरण करणे हा काही व्यवसाय होऊ शकत नाही. त्यासोबत मासिक, पाक्षिक, साप्ताहिक, दिवाळी विशेषांक वितरित करणेही आवश्यक आहे.

कोरेगाव शहर, शिरढोण, शिरंबे, गोळेवाडी या गावांमधील वाचकांकडून प्रतिसाद मिळाल्याने अंक वितरण विभागातील वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी यांच्याकडून कामातील तंत्र आत्मसात करून घेतले. हे काम शिकण्यास त्यांना सुरुवातीला महिन्याचा कालावधी लागला. त्यांनी यामध्ये वृत्तपत्रांचे गट्टे फोडण्यापासून वृत्तपत्र वितरणाच्या लाईनमधील वाचक संख्या विचारात घेऊन त्यानुसार वृत्तपत्रांचे सॉर्टिंग करणे, अंकामधील बदलाच्या सूचना लिहिणे, अंकामध्ये पुरवण्या भरणे आदी प्रकारची कामे त्या स्वत: करतात. हे काम शिकताना सुरुवातीला थोडा त्रास झाला. तरीपण आज त्या हे काम प्रसंगी पतीच्या मदतीशिवाय करतात. अंक वितरणाचे काम करण्यासाठी दररोज पहाटे ४ वाजता उठून थंडी, वारा, पाऊस आदी नैसर्गिक अडथळ्यांचा सामना करत अंक वितरणाचे काम सासूबाई फुलाबाई घाडगे, दोन मुली अमृता व ईश्वरी यांच्या पाठिंब्यामुळे तसेच अंक सॉर्टिंगच्या कामासाठी सुरुवातीपासून जितेंद्र विलास शहा यांनी सातारा-पंढरपूर रस्त्यालगत जागा व विजेचे कनेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे व्यवसायातील वाटचाल सुसह्य झाली असल्याची माहिती अरुणा घाडगे यांनी सांगितली.

शब्दांकन - हेमा संभाजी किर्दाक

करमाळा, जि. सोलापूर