शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्ट्यांमुळे आरोग्य धोक्यात!

By admin | Updated: February 9, 2015 00:40 IST

अवैध धंद्यात वाढ : फलटण शहर व तालुक्यात रस्त्याच्या कडेला उभारताहेत भट्ट्या

फलटण : ‘फलटण शहर व तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायात वाढ होत आहे. आता तर रस्त्याच्या कडेला अनधिकृरीत्या वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणावर उभारल्या जात आहेत. वीटभट्ट्यांमुळे होत असलेल्या प्रदुषणामुळे वाटसरूंबरोबरच तेथे काम करत असलेल्या कामगारांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.फलटण शहर व तालुक्यात कुचकामी प्रशासनामुळे अवैध व्यवसायाची वानवा नाही. चोरटी वाळू वाहतूक, अवैध वृक्षतोड, अनधिकृत क्रशर याच्याबरोबरच आता कोणताही परवानगी न घेता वीटभट्ट्यांचे मोठे जाळे फलटण शहर व तालुक्यात पसरत चालले आहे. शहरात अनेक वीटभट्ट्या आहेत. तशाच ग्रामीण भागातही रस्त्याच्या कडेला वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्ट्यांना परवानगी नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नाही, अशा परिस्थितीत उभारलेल्या वीटभट्ट्यांमुळे पर्यावरणाची हानी होऊ लागली आहे. वीटभट्ट्या उभारताना जनतेची कशी गैरसोय होईल, याचीच काळजी घेतल्याचे दिसून येते. वीटभट्ट्या शेकण्यासाठी टायर, जळके आॅईल, खराब वायरी, तारा आदींचा वापर केला जात आहे. यातून निघणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. तसेच टायरी जळत असल्यामुळे घाण वास येत असल्याने नाक हातात धरून जावे लागते. डोळ्यात धूर गेल्यास डोळ्यांची आग होतेच; पण नाका तोंडात धूर गेल्यास खोकलाही येत आहे. धुरामुळे व वासामुळे पर्यावरणाची हानी होतेच; पण वीटभट्ट्यांवर काम करणारे कामगारही आजारपणाच्या विळख्यात सापडले आहे. धूर व वासामुळे अनेकांना दम्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वीटभट्ट्यांभोवती वावरत असताना हेवेतील आॅक्सिजन कमी होण्याबरोबरच कार्बनडायआॅक्साईड जास्त प्रमाणात शरीरात जात असल्याने विविध कामगारांना अनेक व्याधी बळावत चालल्या आहेत. (प्रतिनिधी)जाचक अटींची पर्वा कुणालावीटभट्ट्या सुरू करण्याची परवानगी घेताना अनेक कागदपत्रे जमा करावे लागतात. त्यासाठी जाचक अटी असल्या तरी त्याची कोणालाच पर्वा नसल्याचे स्पष्ट होत आहे. कोणालाही न जुमानता अनेकांनी वीटभट्ट्या सुरू केल्या आहेत. शासकीय यंत्रणेबरोबरच प्रदूषण व पर्यावरण विभागही याकडे कानाडोळा करत आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींमधून केला जात आहे.वीटभट्टीच्या धुरामुळे श्वसनाचे अनेक आजार होत चालले आहेत. याचा धूर आरोग्यास हानिकारक असण्याबरोबरच तेथे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्यही बिघडत आहेत. वीटभट्टीभोवती वावरणेही धोकादायक आहे. नेहमी आरोग्य तपासणी करण्याबरोबरच धूर आणि वास या संबंधित प्रतिबंधक उपाययोजना करावी.- डॉ. सुभाष गुळवे, फलटण