रोटरमध्ये हात अन् तोंड अडकून शेतमजुराचा चेंदामेंदा; परिसरात हळहळ, साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 07:24 PM2021-10-19T19:24:40+5:302021-10-21T18:54:23+5:30

 शंकर रामजी शेलार (वय ४५, रा.बुरडाणी कोट्रोशी, ता. महाबळेश्वर) असे रोटरमध्ये अडकून मृत्यूमुखी पडलेल्या शेतमजुराचे नाव आहे.

Hand and mouth stuck in the rotor; the incident in Satara | रोटरमध्ये हात अन् तोंड अडकून शेतमजुराचा चेंदामेंदा; परिसरात हळहळ, साताऱ्यातील घटना

रोटरमध्ये हात अन् तोंड अडकून शेतमजुराचा चेंदामेंदा; परिसरात हळहळ, साताऱ्यातील घटना

Next

सातारा : शेतात पॉवर ट्रेलरने शेतीचे काम करीत असताना रोटरमध्ये हात व तोंड अडकून एका शेतमजुराच्या शरीराचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. ही दुर्देवी घटना महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथे दि. १७ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

 शंकर रामजी शेलार (वय ४५, रा.बुरडाणी कोट्रोशी, ता. महाबळेश्वर) असे रोटरमध्ये अडकून मृत्यूमुखी पडलेल्या शेतमजुराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  शंकर शेलार हे त्यांच्या शेतामध्ये पॉवर ट्रेलरने शेतीचे काम करत होते. त्यावेळी अचानक त्यांचा हात पॉवर ट्रेलरमध्ये अडकला. त्यानंतर काहीक्षणातच त्यांचे तोंडही त्यामध्ये अडकले. त्यामुळे त्यांच्या तोंडाचा चेंदामेंदा झाला. 

या भीषण अपघाताची माहिती महाबळेश्वर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जागेवरच पंचनामा केला. शेलार यांचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने बुरडाणी कोट्रोशी येथे हळहळ व्यक्त होत आहे. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास हवालदार राजू मुलाणी हे करत आहेत.

Web Title: Hand and mouth stuck in the rotor; the incident in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.