Gutkha stock found in car in Satara | साताऱ्यात कारमध्ये सापडला गुटख्याचा साठा

साताऱ्यात कारमध्ये सापडला गुटख्याचा साठा

ठळक मुद्देसाताऱ्यात कारमध्ये सापडला गुटख्याचा साठा दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा : येथील राजवाडा परिसरातील तांदूळआळीमध्ये एका कारमध्ये सुमारे ३६ हजारांचा गुटख्याचा साठा शाहूपुरी पोलिसांना सापडला असून, याप्र्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नौशाद इमामुद्दिन मोदी, सद्दाम नौशाद मोदी (रा. शनिवार पेठ, सातारा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजवाडा परिसरातील तांदूळआळीमध्ये एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुपारी पोलिसांचे एक पथक तेथे पाठविले. या पथकाने तांदूळआळीतून समोरून येणाºया कारला अडवले. त्यानंतर कारची तपासणी केली असता प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी कारसह १ लाख ८६ हजारांचा ऐवज दोघांकडून जप्त केला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Gutkha stock found in car in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.