शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

योजनांच्या लाभासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST

त्रिपुडी, ता. पाटण येथील ग्रामपंचायत कार्यालयात लेक लाडकी अभियान व तालुका प्रशासन यांच्यावतीने ‘मी समृध्द, गाव समृद्ध’ योजनेअंतर्गत वीस ...

त्रिपुडी, ता. पाटण येथील ग्रामपंचायत कार्यालयात लेक लाडकी अभियान व तालुका प्रशासन यांच्यावतीने ‘मी समृध्द, गाव समृद्ध’ योजनेअंतर्गत वीस महिलांच्या नावे असणाऱ्या सात-बाराचे वाटप करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार योगेश्वर टोंपे, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अ‍ॅड. शैलाताई जाधव, सरपंच नंदा पाटील, उपसरपंच राहुल देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

किरण कुलकर्णी म्हणाल्या, घर दोघांचे आणि लक्ष्मीमुक्तीची अंमलबजावणी निश्चितच शासन करेल. आज प्रथमच पाटण तालुक्यातील त्रिपुडी गावात महिलांच्या नावे सात-बाराचे वाटप करण्यात आले. हा क्षण विलक्षणीय आहे. यासाठी लेक लाडकी अभियानाने सहकार्य करून पुढाकार घेतला, ही बाब अभिमानास्पद आहे. अशा पध्दतीने शासन, प्रशासन आणि एनजीओ यांच्या मदतीने काम केले, तर महिलांना निश्चित लाभ होईल.

अ‍ॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, त्रिपुडी गावात पतीबरोबर पत्नीला सात-बाराचे वाटप करण्यात आले. १०५ खातेदारांनी पुढाकार घेत आपल्या पत्नीच्या नावाने जमीन तिला सहमालक म्हणून सात-बारावर नोंद केली आहे. यातील पहिले २० उतारे वाटप करण्यात आले. उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी व तहसीलदार टोंपे यांच्या माध्यमातून हे काम झाले आहे.

यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांचेही भाषण झाले. लेक लाडकी अभियानाचे सदस्य जनार्दन पवार, सखाराम पवार, मुख्याध्यापक संजय देसाई, भरत पाटील, ग्रामसेवक एस. एम. कांबळे, विस्तार अधिकारी ए. के. गायकवाड, तलाठी बी. व्ही. गायकवाड, कैलास जाधव, गोविंद देसाई उपस्थित होते.

फोटो : २३केआरडी०५

कॅप्शन :

त्रिपुडी, ता. पाटण येथे महिलांना सात-बाराचे वाटप उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आले.