शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींनी पाणीसाठ्याचे नियोजन करावे

By admin | Updated: November 27, 2015 00:15 IST

दीपक चव्हाण : टंचाई आढावा बैठकीत फलटण तालुक्यातील गावांचा घेतला आढावा

फलटण : ‘तालुक्यातील ग्रामपंचायतीनीं आपल्या गावासाठी आणि आगामी सहा महिन्यांच्या काळात या धरणातील मर्यादित पाणीसाठ्यांची स्थिती याचा विचार करून प्रत्येक ग्रामपंचायतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून टंचाई कमी करण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.जिल्हा परिषद व फलटण पंचायत समिती यांच्या संयुक्त विभागाने जिल्हा बँकेच्या येथील विभागीय कार्यालय सभागृहात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, कृषी सभापती अमित कदम, पंचायत समिती सभापती स्मिता सांगळे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, अशोक सस्ते, गटविकास अधिकारी नीलेश काळे उपस्थीत होते.सोनवलकर म्हणाले, ‘नेहमी फेब्रुवारी, मार्चमध्ये उपलब्ध पाणीसाठ्यांची माहिती घेऊन आगामी काळीतील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागते. यावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले नाही. त्यामुळे तलाव, पाझर तलाव, ओढे कोरडे राहिले. जवळपास सर्वत्र पाणीटंचाई गंभीर झाली. या परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याच्या वापराचे योग्य नियोजन करून आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत टॅकरशिवाय पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अंतिम उपाय म्हणून टँकर सुरू करण्यात येणार आहे.’जिंती ग्रामपंचायतीने क्षारयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने नीरा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने नीरा उजव्या कालव्यावरून जिंतीसह परिसरातील चार-पाच गावांसाठी एक योजना करण्याची मागणी केली. कोळकीचे सरपंच दत्तोपंत शिंदे यांनी प्रादेशिक योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदेने वीजबिलांपैकी काही निधी करून दिली पाहिजे. वाठार निंबाळकर ग्रामपंचायतीने ढवळ प्रादेशिक योजना परिसरातील चार-पाच ग्रामपंचायतींद्वारे चालविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सोमंथळी ग्रामपंचायतीची विंधनविहीर सांगवी ग्रामपंचायत हद्दीत असून, सोमंथळीला अन्य योजनेतून पाणी उपलब्ध झाल्याने या विंधन विहिरीचे पाणी सांगवीसाठी उपलब्ध करून दिले होते. सोमंथळीत पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने या विंधन विहिरीचे पाणी सोमंथळीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. (प्रतिनिधी)हातपंप दुरुस्तीचा निर्णयतालुक्यातील ९० ते ९५ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गावाचे उपलब्ध पाणीसाठे, पाणीपुरवठा योजनांची स्थिती यांचा आढावा सुरुवातीला घेण्यात आला. यात पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती देखभाल, विहिरीचे खोलीकरण, गाळ काढणे उभी आडवी कूपनलिका घेणे, हातपंपाची दुरुस्ती या उपाययोजना संबंधित अधिकाऱ्याद्वारे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.