शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या अर्धवट माहितीवर गोरे-शिंदेंचा थयथयाट!

By admin | Updated: October 27, 2015 00:24 IST

दिलीप येळगावकर : राज्य शासनाने अद्यादेशाद्वारे ८ आॅक्टोबरला ६२ कोटी दिल्याची माहिती

सातारा : ‘गेल्या २५ वर्षांत विजय शिवतारे यांच्याइतका आग्रही आणि दुष्काळ प्रश्नावर पोटतिडीक असलेला पालकमंत्री लाभला नसल्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिहे-कटापूर योजनेसाठी त्यांच्याच प्रयत्नामुळे ८ आॅक्टोबर रोजी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने अद्यादेश काढून या योजनेसाठी ६२ कोटींचा निधी खर्च करण्यास परवानगी दिली असून, आमदार शशिकांत शिंदे व आमदार जयकुमार गोरे हे अर्धवट माहितीच्या आधारे लोकांची दिशाभूल करत आहेत,’ असा घणाघात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.जिहे-कटापूर योजनेबाबत श्रेयवाद सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. येळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेचा इतिहास मांडून सद्य:स्थितीचीही माहिती दिली. यावेळी खटाव तालुक्यातील पवारवाडी गावचे सरपंच रमेश जाधव उपस्थित होते. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भोगले; पण यापैकी एकानेही दुष्काळ प्रश्नावर तळमळ दाखविली नाही. जिहे-कटापूर योजनेवर खटाव-माण तालुक्यांतील शेतकरी डोळे लावून बसले असताना राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीच्या शासनाने केवळ निधी मंजूर केल्याचे भासवले, प्रत्यक्षात तो खर्च केला नाही. त्यामुळे या योजनेचे काम रखडले. साहजिकच त्याची निर्मिती किंमत वाढल्याने त्याचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला आहे,’ असा आरोपही येळगावकर यांनी केला.योजनेचा इतिहास सांगताना येळगावकर म्हणाले, ‘कर्नल आर. डी. निकम यांनी १९७८ मध्ये या जिहे-कटापूर योजनेची संकल्पना मांडली. त्यांनी शरद पवारांपासून इतर काही मुख्यमंत्र्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला; पण ही योजना कुणीच स्वीकारली नाही. १९९६ मध्ये युतीचे शासन आल्यानंतर निवृत्त अभियंता संघटनेने हा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता. हा प्रस्ताव तत्कालीन मंत्री महादेव शिवणकर यांच्यापुढे ठेवल्यानंतर या योजनेचा सर्व्हे झाला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली. खातगुण येथे तत्कालीन मंत्री खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते योजनेच्या कामाची कुदळ मारण्यात आली. मंत्री गिरीश बापट, हिंदुराव नाईक-निंबाळकर व मी स्वत: योजनेसाठी प्रयत्न केले होते. आघाडी शासनाच्या काळात या योजनेच्या बोगद्याच्या कामाची यंत्रे बारामतीच्या जानाई-मळाई योजनेच्या कामासाठी पळविल्यानंतर मी विधानभवनापुढे उपोषण केले होते. या उपोषणानंतर सर्व साहित्य जिहे-कटापूर योजनेसाठी आणण्यात आले. पाटबंधारेच्या कामासाठी ‘हेड वाईज’ निधी मंजूर करण्यासाठी मी केलेला प्रयत्नानंतर राज्य शासनाने मंजूर केला.तत्कालीन पालकमंत्र्यांनी लहरीप्रमाणे या योजनेकडे पाहिले त्यामुळे ५ ते १० कोटींच्यावर निधी मिळाला नाही. या योजनेसाठी ६८० कोटींचा खर्च येणार असून, त्यातील ३०६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ६२ कोटींची भर पडल्याने या कामाला गती मिळेल, असा विश्वासही येळगावकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी) काँगे्रस-राष्ट्रवादी नेत्यांवर साधला निशाणाआ. शशिकांत शिंदे पालकमंत्री असताना त्यांनी तडजोड करून उरमोडीचे पाणी सांगलीकडे पळविण्याचा डाव आखला होता, तो आपण हाणून पाडला. आ. जयकुमार गोरे सत्ता असताना गप्प राहिले, आता अर्धवट माहितीच्या आधारावर बोलत आहेत. आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी निधी आणण्याबाबत काहीच हालचाल केली नाही. दुष्काळग्रस्तांसाठी विधानभवनापुढे आंदोलन करत असताना आ. बाळासाहेब पाटील माझ्यावर हसत होते. नाटक थांबवा, असं उपहासानं म्हणत होते; पण दुष्काळी तालुके त्यांच्या मतदारसंघाला जोडले गेल्यानंतर त्यांना दुष्काळाबाबत बोलण्याचा कंठ फुटला आहे, असे तीर सोडत येळगावकरांनी काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला. पंचपक्वान्नाचे ताट पंचपक्वान्नाचे ताट समोर ठेवून हात बांधून जेवायला लावायला सांगणाऱ्यापैकी काँगे्रस-राष्ट्रवादीचे नेतेमंडळी होते. मात्र, पालकमंत्री विजय शिवतारे व माझ्या आग्रहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिहे-कटापूर योजनेच्या कामाला गती देण्याची घोषणा करून राज्यपालांना पत्र लिहिले. राज्यपालांच्या सूत्रातून योजनेची सुटका करून घेतली, असेही येळगावकर म्हणाले.