शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

खंबाटकी घाटातून जाताय? ...सावधान!

By admin | Updated: December 2, 2014 23:35 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : तुटलेल्या संरक्षक कठड्यामुळे प्रवास झालाय जीवघेणा

खंडाळा : खंबाटकी घाटातील अरुंद वळण रस्ते, तुटलेले संरक्षक कठडे, खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे घाटरस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. महामार्ग रस्ते विकास प्राधिकरणाकडे अनेकदा सूचना करूनही यामध्ये काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे खंबाटकी घाटातील प्रवास आल्हादायक वाटत असला तरी तो तितकाच घातकही आहे. त्यामुळे प्रवाशांनो जरा जपूनच...
खंबाटकी घाट व बोगदा परिसर अनेक प्राणघातक अपघाती घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. गेल्या दोन वर्षांत शेकडो प्रवाशांचा नाहक बळी गेला आहे. अपघातानंतर अनेकदा रस्त्याच्या सुधारणांबाबत प्रशासनाकडे सूचना केल्या जातात. मात्र तात्पुरती होकारार्थी मान डोलावणारे अधिकारी पुन्हा लक्षही देत नाहीत. हे नेहमीचाच अनुभव खंडाळकरांसाठी आहे. पूण्याहून साताराकडे जाताना लागणाऱ्या घाटातील रस्त्याची दुरवस्था आहे. या स्त्यावरील ठिकठिकाणचे संरक्षक कठडे तुटून पडले आहेत. याठिकाणी वाळूची पोती भरून ठेवली असली तरी अपघातात गाडी कोसळून घाटात जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या साईडपट्ट्या खचलेल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वाहनांना प्रवास करता येत नाहीत. घाटातील ही स्थिती प्रवासासाठी घातक ठरत आहे. मात्र हायवे प्रशासन मात्र अद्यापही गांधारीच्याच भुमिकेत आहे.
साताराहून पुण्याकडे जाताना बोगदा ओलांडल्यानंतरही रस्त्याची वळणे घातक ठरत आहेत. अशास्त्रीय वळणांमुळे कित्येक अपघात घडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी खासगी बसच्या अपघातामुळे वळणांचा धोका प्रकर्षाने जाणवला होता. यानंतर ही वळणे काढून सरळ रस्ता बनविण्याचे प्रशासनाने ठरवले होते. या वळणांवर केवळ पांढरे पट्टे ओढून सूचना फलक लावले आहेत. (प्रतिनिधी)