..अन् रागाने चायनीज चालकाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली, दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 19:00 IST2022-03-14T18:52:55+5:302022-03-14T19:00:23+5:30

तुला मस्ती आली आहे का, तुला पैसे पाहिजेत का, असे म्हणून त्याच्या हातातील काचेची बाटली नायक यांच्या डोक्यात मारली. यात ते गंभीर जखमी झाले.

Glass bottle smashed into Chinese man for borrowing money, both charged in satara | ..अन् रागाने चायनीज चालकाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली, दोघांवर गुन्हा दाखल

..अन् रागाने चायनीज चालकाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली, दोघांवर गुन्हा दाखल

सातारा : उधारी दिलेले पैसे मागितल्याने चायनीज चालकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरात घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अजय आणि ईश्वर बापू मोरे (रा. गेंडामाळ, झोपडपट्टी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकरराव रामुहरी नायक (वय ४०, सध्या रा. रविवार पेठ, सातारा मूळ रा. ओरिसा) यांचा आयटीआयजवळील भिंतीच्या कडेला चायनीजचा गाडा आहे. या गाड्यावर मागील उधारीच्या कारणावरून संशयितांनी नायक यांना काही दिवसांपूर्वी शिवीगाळ व दमदाटी केली होती. दरम्यान, दि. ११ रोजी रात्री साठेआठच्या सुमारास वरील दोघे संशयित पुन्हा त्यांच्या गाड्याजवळ आले. दोघांनी ट्रीपल राईस मागितले.

राईस ते बनवत असताना ईश्वर मोरे अचानक तेथे गेला. तुला मस्ती आली आहे का, तुला पैसे पाहिजेत का, असे म्हणून त्याच्या हातातील काचेची बाटली नायक यांच्या डोक्यात मारली. यात ते गंभीर जखमी झाले. असे असतानाही गाड्यावरची सुरी घेऊन मोरे हा नायक यांच्या अंगावर जाऊन तुला आता कापतोच, अशी धमकी दिली.

या प्रकारानंतर नायक यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दिली. सहायक फाैजदार निकम हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Glass bottle smashed into Chinese man for borrowing money, both charged in satara