शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित पाणी योजना पालिकेकडे द्या

By admin | Updated: December 1, 2015 00:14 IST

प्राधिकरणावर संताप : पुरेसे पाणी मिळत नसल्याची नागरिकांची ओरड; हुतात्मा महाडिक यांच्या स्मारकाचा विषयही एकमताने मंजूर

सातारा : ‘शहरातील सुधारित पाणी योजनेचे काम बारगळलेल्या स्थितीत आहे. २४ तास पाण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत,’ अशा भाषेत सातारा पालिकेच्या विशेष सभेत बहुतांश नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची विशेष सभा सोमवारी छ. शिवाजी सभागृहात झाली. पाण्याबाबत नियोजन नसल्याने लोकांना टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे बहुतांश नगरसेवकांनी यावेळी स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, ‘शहरातील नागरिक वारंवार पाणीटंचाईमुळे पालिकेत येतात. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांना देता येत नाही, हे असंच सुरू राहिलं तर मोठा संघर्ष होऊ शकतो.’अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी सुधारित पाणी योजनेच्या कामाबाबत तीव्र स्वरूपात चिंता व्यक्त केली. मुदत संपूनही काम पूर्ण होत नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर कारवाई करण्याची तयारी सुरू करा, ही योजना पालिकेने ताब्यात घेतली, तर वेगाने हे काम पूर्ण होईल, असे सांगितले. नगरसेवक तुषार पाटील यांनी शहरातील ९० टक्के नळांना तोट्या नसल्याचा आरोप केला. पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे असून, शहरातील बोअरवेल लोकसहभागातून दुरुस्त केल्यास पाणीटंचाईची चिंता मिटू शकते, असे सांगितले. नगरसेवक प्रवीण पाटील, कल्याण राक्षे, निशांत पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेऊन आपली मते नोंदवली. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक-घोरपडे यांच्या स्मारकाचा विषय सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. या स्मारकामुळे कर्नल संतोष यांची स्मृती कायम राहणार आहे. जानेवारी महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे स्मारकाचे संकल्पक अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी सांगितले. ई निविदा मागविताना बयाणा रक्कम पालिकेकडे जमा व्हावी, शासनाच्या विविध योजनांमधील कामांची निवड करून मंजुरी देणे, शनिवार पेठेतील वाहनतळ आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)जिंदा रहने के मौसम बहोत हैं मगर...!हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाला मंजुरी देताना नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांच्यासह सर्वच नगरसेवक भावूक झाले होते. अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी तर हुतात्मा गीताच्या ओळी म्हणून कर्नल संतोष यांना आदरांजली वाहिली. ‘जिंदा रहने के मौसम बहोत हैं मगर जान देने की ऋतू रोज आती नहीं...!’ अशा शब्दांनी अ‍ॅड. बाबर यांनी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणले. या स्मारक उभारताना त्याची देखभाल चांगल्या पद्धतीने ठेवण्याची अपेक्षा अ‍ॅड. बाबर, रवींद्र झुटिंग यांनी केली. या विषय मांडल्याबद्दल सर्वांनी अ‍ॅड. बनकर, अध्यक्ष व उपाध्यक्षांचे कौतुकही केले.