साताऱ्यात शाळकरी मुलीचा विनयभंग, युवकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:22 IST2019-03-30T12:20:48+5:302019-03-30T12:22:08+5:30
सातारा शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.

साताऱ्यात शाळकरी मुलीचा विनयभंग, युवकावर गुन्हा दाखल
सातारा: शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.
एजाज शेख (रा. गुरूवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित अल्पवयीन मुलगी साताऱ्यातील एका शाळेत शिकत आहे. संशयित आरोपी एजाज शेख याने पीडित मुलीशी फोनवर संपर्क करून माझ्या मोबाईलवर फोन कर, अशी तंबी दिली.
तसेच तिचा वारंवार पाठलाग करून तिला गाडी आडवीही मारली. या प्रकारानंतर संबंधित पीडित मुलीने हा प्रकार तिच्या घरातल्यांना सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित आरोपी एजाज शेखला तत्काळ ताब्यात घेतले आहे.