संतापजनक! भरदिवसा झाडाखाली चिमुकलीवर अत्याचार, एकास अटक; खटाव तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:52 IST2022-05-04T16:51:18+5:302022-05-04T16:52:55+5:30
वडूज : भरदिवसा एका आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आंब्याच्या झाडाखाली एकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडूज ...

संतापजनक! भरदिवसा झाडाखाली चिमुकलीवर अत्याचार, एकास अटक; खटाव तालुक्यातील घटना
वडूज : भरदिवसा एका आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आंब्याच्या झाडाखाली एकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडूज पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गजनान आनंता खैरे (वय ३५, रा. कल्याण ता. मेहकर, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलीचे कुटुंब ऊसतोड मजूर असून, वडूज परिसरातील एका गावच्या हद्दीतील शिवारात ते वास्तव्यास आहेत. सोमवारी (दि.२) दुपारच्या सुमारास कोपीत जाऊन चिमुकल्या मुलीला उचलून खैरे याने आंब्याच्या झाडाखाली नेले. येथे त्याने त्या मुलीवर अत्याचार केला. मुलगी आरडाओरड करत होती. मात्र, तरीही त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकाराची माहिती मुलीच्या आईला समजल्यानंतर आईने वडूज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गजानन खैरे याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.