सैदापूर येथे शॉक लागून मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST2021-07-08T04:26:07+5:302021-07-08T04:26:07+5:30

सातारा: शहरालगत असणाऱ्या सैदापूर येथे घरातील पाण्याच्या मोटारीची पिन लावत असताना शॉक लागल्याने एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ...

Girl dies of shock at Saidapur | सैदापूर येथे शॉक लागून मुलीचा मृत्यू

सैदापूर येथे शॉक लागून मुलीचा मृत्यू

सातारा: शहरालगत असणाऱ्या सैदापूर येथे घरातील पाण्याच्या मोटारीची पिन लावत असताना शॉक लागल्याने एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सानिका सुरेश घाडगे (रा. सैदापूर, ता. सातारा) असे शॉक लागून मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, सानिका ही मंगळावार, दि. ६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरी पाणी भरत होती. यावेळी ती विद्युत मोटारीची पिन घरात असणाऱ्या स्वीच बोर्डला जोडण्यासाठी गेली. याच वेळी तिला शॉक लागला आणि ती बेशुद्ध झाली. या घटनेनंतर तिला बेशुद्धावस्थेतच क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. याबाबतची खबर वैद्यकीय अधिकारी दीपाली राठोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कदम हे करत आहेत.

Web Title: Girl dies of shock at Saidapur