शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

टळटळीत उन्हात चाले ‘हा खेळ सावल्यांचा’

By admin | Updated: March 16, 2016 23:52 IST

गळ्यातही जादू : खाकीच्या आतला ‘मिमिक्री आर्टिस्ट’ मित्रांचे करतो मनोरंजन; दीपक कणसे यांचे नावच पडलेय ‘नाना’

अजय जाधव-- उंब्रज --माणसाच्यात असलेली कला ही त्यांचे नाव मोठे करते; परंतु सातारा जिल्हा पोलिस दलात असा एक अवलिया आहे की, त्यांच्या कलेमुळे त्यांचे नावच बदलले गेले आहे. विविध कलाकारांचा आवाज हुबेहूब काढणे, सावलीचा खेळ करणे या कलेमुळे सातारा जिल्हा पोलीस दलात त्यांना ‘नाना’ या नावाने ओळखले जाते.पोलीस नाईक दीपक शिवाजी कणसे ऊर्फ नाना हे गेली १९ वर्षे सातारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. शालेय जीवनापासून त्यांना चित्रपटाचे आकर्षण. त्यातच नाना पाटेकर यांचे ते फॅन. या प्रेमापोटीच त्यांनी नाना पाटेकर यांच्या आवाजाची नक्कल सुरू केली. सरावानंतर ते त्यांच्यासारखेच आवाज काढू लागले. मिथून, निळू फुले, शक्ती कपूर, राजकुमार यांचेही आवाज नाना हुबेहूब काढतात.आवाजाची कला अवगत करत असताना त्यांनी ‘सावलीचा खेळ’ ही कला आत्मसात केली. आवाज दोन हातांचा, बोटांचा ते असा वापर करतात की त्याच्या सावलीतून पोपट, उडता पक्षी, हरीण, कुत्रा, गाय, बदक, मांजर, टोपी यांच्या प्रतिकृती तयार होतात. हे सावलीचे खेळ एवढ्या वेगाने काम करतात की, सावलीत जणू खरोखरचे प्राणीच असल्याचा आभास निर्माण होतो. असा हा ‘नाना’ हा कायम हसत खेळत पोलीस दलात वावरत असतो. यापूर्वी पोलीस दलाकडून सहाय्यता निधीसाठी आॅर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला जात असे. अशा कार्यक्रमातून कला सादर करण्यासाठी नानांना हमखास बोलावणे असे. विविध व्यक्तींचे आवाज काढणे, अर्थात मिमिक्री ही अत्यंत कष्टसाध्य कला आहे. प्रत्येकाच्या आवाजाचे स्वतंत्र वैशिष्ट्य असते. कोणत्याही दोन व्यक्तींच्या आवाजाचे वैशिष्ट्य एकसारखे नसते. त्यामुळे ‘मिमिक्री आर्टिस्ट’ ज्याचा आवाज काढायचा असेल, त्याच्या वैशिष्ट्यांच्या जास्तीत जास्त जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो. या प्रक्रियेत घशावर तर ताण पडतोच; परंतु बोलताना संबंधित कलावंत ज्याप्रमाणे अंगविक्षेप करतो, त्याचीही नक्कल अनेकदा करावी लागते. तरच जास्तीत जास्त हुबेहूब आवाज काढता येतो. ही कला नानांनी एवढ्या धावपळीच्या नोकरीत असून कष्टाने वश करून घेतली आहे. सावल्यांचा खेळ तर खूपच कमी लोकांना जमतो. बोटांच्या वेगवेगळ्या रचना करून सावली निरखून खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि मगच लोकांसमोर ही कला सादर करावी लागते. हा ‘शॅडो प्ले’ सध्या मोठ्या प्रमाणावर पुन्हा लोकप्रिय होताना दिसतो आहे. तथापि, नानांना कोणत्याही स्टेजवर जाऊन बडेजाव मिरवायचा नाही. पोलीस दलातले मित्र खूश झाले म्हणजे नाना खूश!मित्रांचा आग्रह मोडवत नाहीपोलीस दलात कामाचा ताण सर्वांवरच असतो. अशा वेळी मी विविध विनोद, आवाज नक्कल करतो. यामुळे वातावरण हसते राहते. अनेकवेळा कामानिमित्त जुने मित्र ठाण्यात येतात किंवा मी इतर ठाण्यात जातो. त्यावेळी मला या कला सादर कराव्याच लागतात. यामुळे माझ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य मला या कलेसाठी प्रेरणादायी ठरते, असे नानांनी सांगितले आणि लगेच नाना पाटेकर यांचा ‘साला एक मच्छर आदमी को.. ,’ हा डायलॉग ‘सेम’ आवाजात ‘सेम’ अ‍ॅक्शनमध्ये सादर केला.