शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे चोरणारी फलटणची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 10:32 IST

फलटण तालुक्यामध्ये जनावरे चोरणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांनी जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एक गाय आणि वासरू ताब्यात घेऊन मालकाच्या स्वाधीन करण्यात आले.

ठळक मुद्देजनावरे चोरणारी फलटणची टोळी गजाआडगाय, वासरू मालकाच्या स्वाधीन : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : फलटण तालुक्यामध्ये जनावरे चोरणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांनी जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एक गाय आणि वासरू ताब्यात घेऊन मालकाच्या स्वाधीन करण्यात आले.सचिन लक्ष्मण बुरुंगले (वय ३०), नितीन लक्ष्मण बुरुंगले (वय २५), विकास महादेव चोपडे (वय ४५), तुकाराम शिवाजी पांढरे (वय ४२, सर्व रा. राजाळे, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, फलटण तालुक्यातील बुरुंगेवस्ती येथील काहीजणांनी एक गाय व वासरू चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वरील चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी घराच्या आडोशाला जनावरे बांधून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन एक गाय व वासरू यांची सुटका करून मालकाच्या ताब्यात दिले. संबंधित चौघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतीराम बर्गे, विनोद गायकवाड, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, धीरज महाडिक आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर