शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

होरपळलेल्या पिकांना झारीने पाणी

By admin | Updated: June 29, 2014 00:28 IST

शेतकऱ्यांवर आस्मानी संकट : ओढ्याच्या पाण्यावर पिके जगवण्यासाठी धडपड

मल्हारपेठ : मान्सूनच्या पावसाने पूर्ण ओढ दिल्यामुळे पेरणीबरोबर उगवलेल्या क्षेत्रावर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काही ठिकाणी शेतकरी पेरणी क्षेत्राला झारीने पाणी घालत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाअभावी पेरणीच न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढल्याचे दिसत आहे. पाटण तालुका पूर्णपणे डोंगराळ भागामध्ये विखुरलेला आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी भाताचे पीक घेतले जाते. चाफळ खोऱ्यासह दिवशी, मोरगिरी, कोयनानगरच्या आसपासच्या सर्व वाडी-वस्तीवर अती पावसाचा भाग असल्यामुळे प्रामुख्याने भात शेतीच केली जाते. सध्या परिसरामध्ये सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांनी भात रोपाची पेरण केलेली आहे. सध्या बाजारामध्ये भरपूर जातीच्या भात वाणाची रेलचेल आहे. कमी दिवसात भरपूर उत्पन्न मिळणाऱ्या वाणाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामध्ये मेनका, पार्वती, रूपाली, पूनम आदी नामवंत भाताची वाण बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यांनी ती पसंत केली आहेत. परंतु कृषी महामंडळाने यावेळी बियाणांचा तुटवडा लक्षात घेऊन घरातीलच बियाणे नीटनेटके करून पेरण्याचे आवाहन केल्यामुळे शेतकऱ्यांनी घरातीलच भात बियाणे टाकले असल्याचे दिसत आहे. भाताची रोपे काही ठिकाणी उगवण्याच्या स्थितीत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम झाल्याचे सर्वत्र दिसत आहे. त्यातच कोयना नदीकाठचे क्षेत्र सोडता डोंगर कपारीमध्ये असणारी भात शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.ऐन वाढीतच पावसाने दडी मारल्यामुळे भात रोपांना ओढ्याचे पाणी शिंपडावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये ओढ्याच्या पाण्याची पातळीसुद्धा खालावल्यामुळे दिसेल त्या डबकातील पाणी घागरीने आणून रोपांवर शिंपडले जात आहे. (प्रतिनिधी)