शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कारखान्यांकडून एफआरपीची तुकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:36 AM

महाराष्ट्रातील नगदी पीक आणि हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून ‘ऊस’ या पिकाकडे पाहिले जाते. साताऱ्यात नीरा, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना आदी नदी व त्यांवर उभारलेल्या धरणांमुळे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यात इतर पिकांचे उत्पादन घेतले जात असले तरी ऊस पिकाला प्राधान्य दिले जाते.

ठळक मुद्देऊस उत्पादक शेतकरी संकटात : साखर उद्योग अडचणीत असल्याचे कारखानदारांकडून ओरड

स्वप्नील शिंदे ।सातारा : साखर उद्योग अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे बुडीत ऊस काढण्याची गरज आहे, असे सांगून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न करता कारखाने सुरू केले. दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना कारखान्यांकडून एफआरपीचे तुकडे केले जात आहेत.

महाराष्ट्रातील नगदी पीक आणि हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून ‘ऊस’ या पिकाकडे पाहिले जाते. साताऱ्यात नीरा, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना आदी नदी व त्यांवर उभारलेल्या धरणांमुळे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यात इतर पिकांचे उत्पादन घेतले जात असले तरी ऊस पिकाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस शेतीसोबत साखर कारखानदारी उभी राहिली. त्यामुळेच येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठी मदत झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंगाम नोव्हेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. हळूहळू जिल्ह्यातील सर्वच सहकारी व खासगी कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले. जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखानांच्या ऊसतोडणी यंत्रणा सध्या जोरात सुरू आहेत.

बहुतांश साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. कायद्यानुसार कारखान्यांनी ऊस गाळपाला नेल्यापासून १४ दिवसांच्या आत उसाच्या एफआरपीची रक्कम ही शेतकºयांच्या खात्यात जमा करणे कारखान्यांसाठी बंधनकारक असते. मात्र, एक-दोन कारखाने सोडले तर इतर कारखान्यांनी उसाच्या एफआरपीबाबत निर्णय घेतलेला दिसत नाही. फलटणचा श्रीराम, साखरवाडीचा श्रीदत्त, कºहाडातील रयत, सह्याद्री आणि कृष्णा कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली. मात्र, इतर कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप सुरू केले.

साखर उद्योग अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे बुडीत ऊस काढण्याची गरज आहे, असे सांगून उसाचा दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केले. मात्र, दर जाहीर न करता आणि एफआरपीचे तुकडे पाडले जात आहेत. महापूर आणि अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यात ऊसतोडणी यंत्रणेकडून पैशांची मागणी केली जात आहे. एकीकडे उत्पादनात घट, तोडणी खर्चात वाढ आणि एफआरपी मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे.

 

  • कारखान्यांकडून गतवर्षीची देणी बाकी...

गतवर्षीच्या गळीत हंगामामध्ये सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपी व दोनशे रुपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र, अजून अनेक कारखान्यांची २०० ते ५०० रुपयांपर्यंतची देणी बाकी आहेत. ती तातडीने मिळावी, अशी मागणी होत आहे.अनेक अडचणींवर मात करीत कारखानदार हा गळीत हंगाम करीत आहेत. त्यात दराची स्पर्धा, गाळपाची स्पर्धा, रिकव्हरीची स्पर्धा पाहायला मिळते. इतर कारखाने गेटकेनद्वारे ऊस पळवत आहेत. त्यामुळे यंदा गळीत हंगाम कमी दिवस होणार आहे. जाहीर केलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असे कारखान्याच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

 

गाळप सुरू होण्यापूर्वी कारखान्यांच्यावतीने एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र, गाळप सुरू केल्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घ्यालावे.- धनंजय महामुलकर,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

  • कारखान्याचे नाव गळीत गळीत साखर रिकव्हरी

दिवस मेट्रिक टन उत्पादनयशवंतराव मोहिते कृष्णा ४४ ३५३८०० ४२२६३० ११.८४कारखाना लि. रेठरे बुद्रुकसह्याद्री कारखाना यशवंतनगर ४२ ३४६१०० ४०५८०० ११.६४किसनवीर कारखाना, भुर्इंज २५ ९८१०० ९७९२० १०.५४जयवंत शुगर, धावरवाडी ४३ १८७६४५ २०४३०० १२.३१अजिंक्यतारा, शेंद्रे ४२ १७५५९० १९३१६० ११.२४बाळासाहेब देसाई कारखाना, मरळी ४२ ६६७१० ७४३०० ११.१५श्रीराम सहकारी, फलटण ४७ १२९७३४ १३४६०० १०.५७न्यू फलटण शुगर, साखरवाडी ३५ ८८६७९ ९१४५० १०.९२जरंडेश्वर कारखाना, कोरेगाव ४० ३२९४३० ३७९८०० ११.२५ग्रीन पावर शुगर, गोपूज ४३ १६५४५० १८२४०० ११.१०अथणी शुगर्स (रयत) शेवाळेवाडी ४१ ९४४०० १०८०२५ ११.८१

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर