महाविद्यालयीन तरुणींच्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 16:38 IST2021-02-12T16:32:20+5:302021-02-12T16:38:50+5:30

Crimenews satara- सातारा येथील एका महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली. संबंधित तरुणींना पोलीस ठाण्यात बोलावून पालकांसमक्ष चांगलीच समज देण्यात आली.

Freestyle fight between two groups of college girls | महाविद्यालयीन तरुणींच्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी

महाविद्यालयीन तरुणींच्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी

ठळक मुद्देमहाविद्यालयीन तरुणींच्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; अनेकांनी मोबाईल स्टेट्सवरही ठेवला

सातारा : येथील एका महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत फ्री स्टाइल हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली. संबंधित तरुणींना पोलीस ठाण्यात बोलावून पालकांसमक्ष चांगलीच समज देण्यात आली.

शहरातील एका महाविद्यालयासमोर दोन दिवसांपूर्वी तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याचवेळी याचा व्हिडिओ काही मुलींनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची निर्भया पथकातील महिला पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतींना पालकांसह बोलावून घेतले. नेमकी कोणत्या कारणातून ही वादावादी झाली, याची माहिती घेतल्यानंतर त्यांना समज देण्यात आली. यापुढे जर वाद झाला तर कारवाईची तंबी त्यांना देण्यात आली आहे.

एकूण दोन व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील दोन मुलींनी गत आठवड्यातही एका मुलीला मारहाण केली होती. याचा व्हिडिओही व्हायरल झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. काही मुलींनी व्हॉट्सॲपला हा वादावादीचा व्हिडिओ स्टेट्स म्हणून ठेवला होता.

Web Title: Freestyle fight between two groups of college girls