ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जंगम अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 14:36 IST2018-04-22T14:36:13+5:302018-04-22T14:36:13+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व काँग्रेस नेते बाबूराव जंगम ( वय ९३) यांचे पुणे येथे शनिवारी अल्प आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर रविवारी दुपारी साताऱ्यातील संगम महुली येथे शासकीय इतमामत  अंत्यसंस्कार करण्यात आले. 

freedom fighter Baburao Jangam funeral | ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जंगम अनंतात विलीन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जंगम अनंतात विलीन

सातारा - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व काँग्रेस नेते बाबूराव जंगम ( वय ९३) यांचे पुणे येथे शनिवारी अल्प आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर रविवारी दुपारी साताऱ्यातील संगम महुली येथे शासकीय इतमामत  अंत्यसंस्कार करण्यात आले. 
जंगम हे प्रतिसरकार चळवळीच्या  कुमठे गटाचे ते उपप्रमुख तर न्यायदान मंडळाचे सदस्य होते. बाबूराव जंगम व त्यांच्या साथीदारांनी त्यावेळच्या डीएसपी गिल्बर्टची खोड मोडली होती. त्यांनी सातारा पोलीस मुख्यालयातील आर्मशॉप फोडून तीन बंदुका पळवल्या होत्या. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: freedom fighter Baburao Jangam funeral