शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे टँकरद्वारे मोफत पाणी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST

खंडाळा : उन्हाळा सुरू होताच भूजल पातळी कमी होत चालली आहे. खंडाळा शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईचे संकट उभे राहिले ...

खंडाळा : उन्हाळा सुरू होताच भूजल पातळी कमी होत चालली आहे. खंडाळा शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभराच्या पाण्यासाठी चणचण भासत आहे. शहरातील लोकांना गरजेपुरते पाणी मिळावे, यासाठी खंडाळा शहर राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने टँकरद्वारे मोफत पाणी वाटप सुरू केले आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळत आहे.

खंडाळा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणी पातळी खालावली असल्यामुळे पाणीपुरवठा नियमित करणे सध्या अशक्य होत आहे. परंतु शहरवासीयांना पाण्याची कमतरता भासू नये या सामाजिक भावनेतून युवक अध्यक्ष प्रकाश गाढवे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने टँकरद्वारे मोफत पाणी वाटप सुरू केले आहे. शहरातील गरजवंतांपर्यंत घरपोहोच पाणी मिळत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

या पाणी वाटप योजनेच्या शुभारंभप्रसंगी वाई विधानसभा युवक अध्यक्ष प्रकाश गाढवे, खंडाळा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मनीष गाढवे, उपाध्यक्ष सत्यवान जाधव, रत्नकांत भोसले, खंडाळा शेतकरी संघटना अध्यक्ष अजित गाढवे, उपाध्यक्ष मारुती खंडागळे, सचिन खंडागळे यांसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

२२खंडाळा

खंडाळा शहर राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने टँकरद्वारे मोफत पाणी वाटप सुरू केले आहे.