शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
4
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
5
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
6
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
9
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
10
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
11
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
12
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
13
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
14
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
15
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
16
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
17
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
19
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
20
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फलटणच्या यशवंत बँकेत ११२ कोटींचा गैरव्यवहार, शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:08 IST

सहकार क्षेत्रात खळबळ

कराड : फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत झालेले लेखापरीक्षण व १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ अशा लेखापरीक्षण कालावधीत कार्यरत असलेल्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर, संचालक नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, स्नेहन कुलकर्णी, कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे,प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ, परशराम जंगाणी, अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुन्द्रावळे, नीलिमा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे, केशव कुलकर्णी, शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर,विठ्ठल ऊर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सुरज गायधनी, विभिषण सोनावणे, दिनेश नवळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ३६ संचालक, ३ कार्यकारी अधिकारी, २ व्यवस्थापक व नातेवाईकांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ यादरम्यान यशवंत बँकेचे अध्यक्ष, कर्मचारी व संचालकांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान केले. परस्पर संगनमताने ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रकमेचा त्यांनी अपहार केला. त्यासाठी बोगस कर्ज प्रकरणे करून या प्रकरणांसाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. कर्जास तारण न घेता अर्ज वितरण केले. बँकेच्या निधीचा गैरविनियोग करून अपहार केल्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.दरम्यान, याबाबत संस्थेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते भ्रमणध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: 1.12 Billion Embezzlement at Yashwant Bank, 50 Charged

Web Summary : A ₹112 crore embezzlement was uncovered at Yashwant Co-operative Bank, Falton. Former chairman Shekhar Charegaonkar and 49 others face charges for the fraud. Bogus loans and fabricated documents were used in the scheme, causing turmoil in the cooperative sector.