शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

साताऱ्यात पाच हजार प्रवाशांपुढे चार पोलिस ठरताहेत भारी!, मध्यवर्ती बसस्थानक ठरतंय चोरीमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:25 IST

लोकवर्गणीतून बसवले चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे

जगदीश कोष्टीसातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज शेकडो गाड्यांची वर्दळ असते. या माध्यमातून दररोज सरासरी पाच हजार तरी प्रवासी ये-जा करत असतात. वेगवेगळ्या गावातील, प्रांतातील लोक एकत्र येणार म्हटल्यावर गुन्हे घडण्याची दाट शक्यता असते. पण साताऱ्यात पाच हजार प्रवाशांपुढे चार पोलिस भारी पडत आहेत. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानक चोरीमुक्त बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे आणि कोल्हापूर या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी सातारा आहे. त्याचप्रमाणे कोकण, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून अहमदनगर, बारामतीकडे जाण्यासाठी सातारामार्गेच जावे लागते. सातारा जिल्ह्यातच जागतिक दर्जाचे महाबळेश्वर, पाचगणी थंड हवेचे ठिकाण, जागतिक वारसास्थळात नोंद झालेले कास पुष्पपठार, किल्ले प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड हे किल्ले गटकोट आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून पर्यटक सातारा जिल्ह्यात येत असतात. त्याचप्रमाणे मांढरगडावरची काळूबाई, औंधची यमाई, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, पुसेगावची सेवागिरी, म्हसवडची सिद्धनाथ, पालीचा खंडोबा आदी ठिकाणी मोठ्या यात्रा भरत असतात. यासाठी राज्यासह कर्नाटकातून भाविक येत असतात.अनेक कारणाने महत्त्वपूर्ण असलेले सातारा जिल्ह्यातील सातारा मध्यवर्ती बसस्थानक कायमच प्रवाशांनी गजबजलेले असते. दररोज सरासरी चार ते पाच हजार प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे गुन्हेेगारी घडण्याची शक्यता जास्त असते. मात्र सातारा मध्यवर्ती बसस्थानकाची जबाबदारी केवळ चार पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. सहायक फौजदार दत्तात्रय पवार यांच्या नेतृत्वाखाली तीन कर्मचारी अविरत कर्तव्य बजावत असतात. यामध्ये दोन कर्मचारी दिवसा व दोन कर्मचारी रात्री कर्तव्य बजावतात.

शाळा-महाविद्यालय दिवसात ताणसातारा शहरातील अनेक शाळा-महाविद्यालये नावाजलेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी साताऱ्यात येतात. यामुळे या काळात पोलिसांवर मोठा ताण असतो. मात्र या परिसरात रोडरोमिओगिरी करण्याचे कोणत्या मुलांचे धाडस होत नाही.

लोकवर्गणीतून चोवीस कॅमेरेसातारा बसस्थानकाचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून सर्वत्र नजर रहावी यासाठी सहायक फौजदार दत्तात्रय पवार यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून चोवीस कॅमेरे बसविले आहेत. पोलीस मदत केंद्रात बसून पोलीस गर्दीवर लक्ष ठेवून असतात. एखाद्या फलाटावर गर्दी झालेली असल्यास तेथे जाऊन मदत केली जाते.वर्षात केवळ दोन दुचाकी चोरीससातारा मध्यवर्ती बसस्थानकातून केवळ दोनच दुचाकी चोरीस गेल्या आहेत. त्यांचाही छडा लागला असून, दोघांना पकडले होते. दिवाळीत तर ही संख्या दुपटीने वाढते तरी चोरीच्या घटना टाळण्यात पोलिसांना शंभर टक्के यश आले आहे, अशी माहितीही पवार यांनी दिली.

सातारा मध्यवर्ती बसस्थानकात प्रत्येक घडामोडीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे हरवलेले लहान मुले, घरातून पळून आलेले अल्पवयीन मुलं, मुलींना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलेले आहे. - दत्तात्रय पवार, सहायक फौजदार, सातारा बसस्थानक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसcctvसीसीटीव्हीtheftचोरी