जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 15:51 IST2020-03-07T15:48:11+5:302020-03-07T15:51:29+5:30

सातारा जिल्हा पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत.

Four police officers transferred in the district | जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची बदली

जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची बदली

ठळक मुद्देजिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची बदलीअधिकाऱ्यांना आपापल्या पोलीस ठाण्यात तत्काळ हजर राहण्याचे आदेश

सातारा : जिल्हा पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत.

वडूज, ता. खटाव येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांची जिल्हा विशेष शाखा, सातारा येथे बदली करण्यात आली आहे तर जिल्हा विशेष शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांची वडूज पोलीस ठाण्यात बदली झाली.

पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची कऱ्हाड शहर तर कऱ्हाड शहरचे सहायक पोलीस निरीक्षक सतिश पवार यांची पाचगणी येथे बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना आपापल्या पोलीस ठाण्यात तत्काळ हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Four police officers transferred in the district