पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 21:45 IST2021-01-31T21:30:52+5:302021-01-31T21:45:01+5:30
Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराड येथील पाचवड फाट्याजवळ इनोव्हा आणि स्विफ्ट गाडीची धडक झाली.

पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
ठळक मुद्देया अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
कराड : पुणे-बंगळुरू महामार्गावरकराडजवळ इनोव्हा आणि स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराड येथील पाचवड फाट्याजवळ इनोव्हा आणि स्विफ्ट गाडीची धडक झाली. या भीषण अपघात चार जण ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे. ठार झालेल्यांमध्ये तीन पैलवान असल्याचे समजते. तसेच, ते पुण्यातील कात्रज येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते.
दरम्यान, या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. तसेच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.